विविधतेने नटलेल्या भारतामध्ये भाषेतही वैविध्य आहे. 14 सप्टेंबर हा दिवस भारतात हिंदी दिवस (Hindi Diwas) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत हिंदी साहित्याला प्रोत्साहन दिले जातं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढील 2 वर्षात म्हणजे 14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहलेल्या हिंदी भाषेचा भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. मग आज देशात बहुसंख्य राज्यात बोलल्या जाणार्या या हिंदी भाषा दिनाचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे. तुम्ही देखील मित्रमैत्रिणींना, प्रियजणांना या हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत आनंद द्विगुणित करू शकता.
बेहर राजेंद्र सिम्हा (Beohar Rajendra Simha)यांची 14 सप्टेंबर 1949 साली 50 वी जयंती होती. त्यांच्या सन्मानार्थ या दिवशी हिंदी भाषा दिवस साजरा करण्यालाही सुरूवात झाली. नक्की वाचा: भारतामध्ये हिंदी दिवस 14 सप्टेंबर दिवशी का साजरा केला जातो? या दिवसाच्या सेलिब्रेशन बाबत '8' इंटरेस्टिंग गोष्टी.
हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा
भारताला अद्याप राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही सरकारी कामकाजांमध्ये ऑफिशिएल लॅग्वेज म्हणून वापरली जाते. हिंदी सोबतच अनेक व्यवहार, देवाण-घेवाण, लेखी काम हे इंग्रजी भाषेमध्ये केले जाते.