चॉकलेट प्रेमींसाठी 7 जुलै हा दिवस खास असतो. खरंतर चॉकलेटप्रेमींना ते खाण्यासाठी कोणत्याही विशेष कारणाची गरज नसते. पण 7 जुलै हा दिवस खास चॉकलेट डे (World Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत जगभरात चॉकलेट प्रेमी आपलं चॉकलेट वरचं खास प्रेम व्यक्त करतात. दरम्यान या दिवसाच्या सेलिब्रेशन मागील नेमकं कारण ठाऊक नाही पण आनंदात आणि दु:खातही अनेकांना मन, डोकं शांत करण्यासाठी चॉकलेट नक्कीच साथीला असतं. मग आज यंदाच्या चॉकलेट दिनी तुम्ही देखील WhatsApp Messages, Facebook Messages, Status, Wishes, HD Images द्वारा या दिवसाचं सेलिब्रेशन द्विगुणित करू शकता.
डार्क चॉकलेट, स्वीट चॉकलेट, मिल्क चॉकलेट असे विविध प्रकार चॉकलेट्स मध्ये उपलब्ध आहेत. काही चॉकलेट्स ही औषधी उपचार म्हणून देखील फायदेशीर आहेत. त्यामुळे चॉकलेट्स तुम्ही योग्य प्रकारचं आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास तुमच्या आरोग्यालाही हितकारी आहे. चॉकलेटप्रेमींसाठी खास Chocolate Dim Sum रेसिपी.
चॉकलेट डे कोट्स
आज चॉकलेट डे सेलिब्रेट करताना तुम्ही आवडीचं चॉकलेट खाण्यापासून ते अगदी चॉकलेट फ्लेवर्स मध्ये विविध पदार्थांची चव चाखू शकता.