8 मार्च हा जागतिक महिला दिन (International Women's Day) म्हणून साजरा केला जातो. समान हक्क, न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षात महिलांनी मोठा लढा दिला. त्यामुळेच आज आपण स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रगती पथावर पाहतो. तसेच महिलांची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध स्तरावरील प्रगतीचा सन्मान या दिनानिमित्त करण्यात येतो.
आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वीकारले जावे म्हणून आंदोलन करण्याची गरज भासत आहे. मात्र हु केअर्स? काय फरक पडतो? आम्ही जसे आहोत तसेच राहणार या विचारावर ठाम असलेल्या अनेक स्त्रिया आपल्याला समाजात पाहायला मिळतात. त्यामुळे आजच्या दिवसाचा आनंद साजरा करत तुमच्या मैत्रीणीला खास व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करा.(हेही वाचा-International Women's Day 2019: पाच भारतीय ट्रान्सजेंडर महिला ज्यांनी प्रवाहातील महिलांपेक्षाही केली दमदार कामगिरी)
>गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे
>विधात्याची नवनिर्माण
कलाकृती तू...
एक दिवस साजरा कर
स्वत:च्या अस्तित्वाचा तू
>तू....अशीच रहा आकाशाला गवसणी घालणारी, जमिनीवर पाय ठेऊन आकाशाला भिडणारी, वाऱ्यावर स्वार होऊन हवी तिथे हवी तशी स्वतःला सामावून घेणारी, पाण्यासारखी प्रत्येक रंगात रंगणारी, अग्नी सारखी तळपणारी कु बुध्दीला जाळणारी, भान ठेऊन स्वतःला सिद्ध करणारी...
>तू तुझ्या डोळ्यात आणू नकोस पाणी;
तू तर आहेस रणरागिणी झांशीची राणी.
>तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देवू नकोस फुले ;
तू तर आहेस शिक्षण घेणारी व देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले.
>स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी,
शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी.
जागतिक स्तरावर महिलांच्या सबलीकरणासाठी या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रांगड्या महाराष्ट्रामध्ये जशा पुरूषांच्या पराक्रमाच्या कथा आहेत तशाच प्रेरणादायी महिला देखील आहेत. त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल जगाला घेणं भाग पडलं आहे.