Happy Women's Day 2021 Images: 8 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च, 1917 रोजी रशियातील महिलांना मताधिकार मिळाला. त्या आधी अमेरिकेतील समाजवादी पक्षाचे पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1909 हा दिवस ‘महिला दिवस’ म्हणून साजरा केला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेने 1910 सालापासून हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करावा अशी सूचना केली. वर उल्लेख केल्याप्रमाणे रशियन महिलांना ८ मार्चला मताधिकार मिळाल्यामुळे हा दिवस 8 मार्चला साजरा करण्यास सुरुवात झाली. तर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला अधिकृत मान्यता दिल्यावर ८ मार्च हा दिवस नियमितपणे जागतिक पातळीवर ‘जागतिक महिला दिवस’ साजरा करण्यास सुरुवात झाली.(International Women's Day 2021 Gift Ideas: 'जागतिक महिला दिना'निमित्त तुमच्या आयुष्यातील खास स्त्री ला द्या हे अनोखे गिफ्ट)
जगभरातील विविध देशात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे सेलिब्रेशन होते. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.आताच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी पूर्वीची परिस्थिती अशी नव्हती. महिलांना शिक्षणाचा, मतदानाचा अधिकार नव्हता. स्वातंत्र्य नव्हते. मुलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या महिला वर्गाला आपले हक्क मिळवण्यासाठी लढावे लागले.(Happy Women's Day: महिलांना रेल्वेमध्ये मिळतात 'हे' खास अधिकार, तुम्हीसुद्धा जाणून घ्या)
महिला सध्या फक्त घरातील कामे न करता ऑफिस, राजकरण किंवा समाजातील एखादा मुद्दा असो त्यासाठी लढा देण्यासाठी पुढे सरसावलेल्या दिसून येतात. तसेच पुरुषांच्या बरोबरोनी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा ठाम निर्णय महिलांनी घेतल्याने त्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहत आहेत. त्यामुळे स्त्रीयांना समजात मान आणि सन्मान देणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असल्याचे म्हटले जाते.