
जगभरामध्ये 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women's Day) साजरा केला जातो, महिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक महिला दिन हा एका विशिष्ट थीम वर साजरा केला जातो त्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न केला जातो. यंदा जागतिक महिला दिन ALL Women and Girls: Rights. Equality. Empowerment या थीमवर साजरा केला जाणार आहे. मग यंदाच्या जागतिक महिला दिनी तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या आयुष्यातील महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा (Happy Women's Day) देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले महिला दिनाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस,Wishes, Quotes, Photos, Greetings शेअर करत यंदाचा महिला दिन थोडा स्पेशल करा.
महिला दिनाच्या सेलिब्रेशनची सुरूवात 20 व्या शतकाच्या सुरुवातीला झाली. जेव्हा कामगार चळवळींनी वेगाने होत असलेल्या औद्योगिकीकरणादरम्यान कामाच्या खराब परिस्थितीविरुद्ध निषेध केला. दरम्यान, 1909 मध्ये अमेरिकेत राष्ट्रीय महिला दिनाची सुरूवात झाली. 1910 मध्ये, Clara Zetkin यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची कल्पना मांडली, त्यानंतर 1911 मध्ये अनेक देशांमध्ये पहिल्यांदा सेलिब्रेशन करण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा





आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध पार्श्वभूमीतील महिलांमध्ये जागतिक एकता सुनिश्चित करतो, त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या धोरणे आणि सामाजिक नियमांवर चर्चा करण्यास प्रोत्साहन देतो. जगभरातील विविध देशात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे सेलिब्रेशन होते. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.