Happy Vat Purnima 2020 Wishes: वटपौर्णिमा सणा निमित्त WhatsApp Stickers, Quotes, Images, Messages, Wallpapers आणि Greetings शेअर करून सौभाग्यवतींना द्या वट सावित्री व्रताच्या शुभेच्छा
Vat Purnima 2020 (Photo Credits-File Image)

Happy Vat Purnima 2020 Marathi Wishes: हिंदू पंचांगानुसार जेष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा (Vat Purnima) साजरी केली जाते. पारंपारिक रूढी आणि धर्मानुसार स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि साताजन्माची गाठ पक्की रहावी म्हणून प्रार्थना करून वडाची पूजा करतात. नववधूंपासून अगदी म्हातार्‍यांपर्यंत सार्‍यांच सुवासिनींसाठी वटपौर्णिमेचा सण खास असतो.  तर यंदा वट पौर्णिमा सणाचा आनंद द्विगुणित करत WhatsApp Stickers, Quotes, Messages, HD Wallpapers आणि Greetings च्या माध्यमातून सौभाग्यवतींना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आज (5 जून) वटपौर्णिमेचा सण सौभाग्यवती महिलांकडून करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतामधील स्त्रिया वडाची पूजा करताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करते. या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व असून तो अनेक वर्ष आयुष्य असणारा एक भक्कम वृक्ष म्हणून ओखळला जातो. यमाकडून चातुर्याने   पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. त्याचसोबत वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया एकमेकांना वाण देतात. (Happy Vat Purnima 2020 Messages: वटपौणिमा मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook वर शेअर करत साजरा करा वटसावित्री व्रताचा खास दिवस!) 

वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री आणि सत्यवान कथा ऐकण्याची प्रथा परंपरा आहे. स्कंद आणि भविष्य पुराणात या व्रताचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्रतामध्ये सर्वात महत्वाचे स्थान वटवृक्षाला देण्यात आले आहे. तसेच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची षोडषोपचार पुजा करत त्याला सूत किंवा धागा बांधण्याची सुद्धा प्रथा आहे. (Vat Purnima Vrat 2020: वटपौर्णिमा यंदा 5 जून ला होणार साजरी; सुवासिनींसाठी खास अशा 'या' व्रताचे महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या)

Vat Purnima 2020 (Photo Credits-File Image)
Vat Purnima 2020 (Photo Credits-File Image)
Vat Purnima 2020 (Photo Credits-File Image)
Vat Purnima 2020 (Photo Credits-File Image)
Vat Purnima 2020 (Photo Credits-File Image)

तर वटवृक्ष हा शिवरुपी असून वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करुन शिवरुपी पतीला मिळवणे असे मानले जाते. त्याचसोबत पतीचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी इश्वराची पूजा करणे असे मानले जाते.