गुढी पाडवा (Gudi Padwa) ही हिंदू नववर्षाची सुरूवात जशी महाराष्ट्रात साजरी केली जाते तशी आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), तेलंगणा (Telangana) आणि कर्नाटकामध्ये (Karnataka) हा सण उगादी (Ugadi) म्हणून साजरा केला जातो. उगादी हे तेलगू बांधवांसाठी देखील नववर्ष असतं. मग या हिंदू नववर्षामध्ये तुमच्या दक्षिण भारतामधील नातेवाईकांना, मित्र मंडळींना, प्रियजणांना या दिवशाच्या शुभेच्छा देण्यासाठी उगादीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्र, मेसेजेस, HD Images पाठवून या सणाचा आनंद द्विगुणित करा. व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), फेसबूक मेसेजेस (Facebook Messages) द्वारा या सणा निमित्त खास मेसेज पाठवून तुम्ही आनंद सोहळा साजरा करू शकता. दरम्यान यंदा कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी थेट गाठी भेटी टाळत घरात राहूनच साधेपणाने हा दिवस साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. Happy Chaitra Navratri Marathi Wishes: चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा मराठीWhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरी करा वासंतिक नवरात्र.
उगादीच्या शुभेच्छा
चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये गौतमीपुत्राची सत्ता आल्याच्या आनंदामध्ये हा दिवस पाडवो किंवा उगादी म्हणून या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात जसा हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. तसाच तो सिंधी लोक चेटीचंड म्हणून साजरा करतात. या सणाच्या शुभेच्छा यंदा सोशल मीडीयामध्ये मेसेज, संदेश, शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा.