आई,वडिलांनंतर आयुष्याला दिशा देण्याचं काम करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा शिक्षकाचा आहे. विद्यार्थी घडवण्याचे मोलाचे काम शिक्षण करत असतात. त्यामुळे भारतामध्ये शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा शिक्षक दिन (Teachers' Day) 5 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. भारताचे0 दुसरे राष्ट्रपती राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून शिक्षक दिन साजरा केला जातो. 1962 पासून भारतात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मग या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, Greetings, Quotes, Messages, Wishes शेअर करून तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. सोबतच शिक्षक दिनाच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबतही शेअर करू शकता.
शिक्षक दिन हा शिक्षकांच्या सन्मानाचा, त्यांच्याकडून विद्यार्थी घडवण्याचं काम अविरत सुरू ठेवण्याच्या तसेच त्यांच्या योगदानाची पोचपावती त्यांना देण्यासाठी साजरा केला जातो. गुरू पौर्णिमेच्या दिवशी देखील अशाच प्रकारे आपल्या आयुष्यातील शिक्षकांचा सन्मान ठेवला जातो. त्यामुळे आज कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून शिक्षकांना थॅक्यू म्हणायला विसरू नका. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शिक्षक दिन नेमका संबंध काय? जाणून घ्या इतिहास, वैशिष्ट आणि महत्त्व
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दिल ज्ञानाचं आम्हाला भंडार
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार
आहोत आभारी त्या गुरूंचे
ज्यांनी केलं आम्हाला जगासाठी तयार
शिक्षक दिन शुभेच्छा
शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत,
ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात,
परंतु इतरांना त्यांच्या 'लक्ष्या'कडे घेऊन जातात
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मोठ्या स्वप्नांचा विचार देण्यासाठी
आकाशाला गवसणी घालण्याची शिकवण देण्यासाठी
मला साहसी बनवण्यासााठी
तुमचे खूप खूप आभार
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या तिरुमणी गावात झाला. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हापासून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा होत आहे. शिक्षक दिन जगातील 100 हून अधिक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. 1994 मध्ये युनेस्कोने स्थापन केलेल्या जागतिक शिक्षक दिनासोबत अनेक देश 5 ऑक्टोबर रोजी त्यांचा शिक्षक दिन साजरा करतात.