Happy Shravan Maas 2024 Messages: श्रावण मास आरंभानिमित्त खास Wishes, HD Images, Greetings द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा सण-उत्सवांनी भरलेला महिना
Happy Shravan Maas 2024 (File Image)

Happy Shravan Maas 2024 Messages In Marathi: पावसाळा ऋतूमध्ये येणाऱ्या श्रावण महिन्याची (Shravan 2024) जवळजवळ सर्वजणच आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात सणांची रेलचेल असते, यासह पावसाची रिमझिम आणि आल्हाददायक उन अशा दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळतात. आषाढात धो धो कोसळणारा पाऊस हा श्रावणामध्ये जरा सौम्य झालेला असतो. त्यामुळे निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण आणि मनाला ऊभारी आणणारी हिरवळ याच महिन्यात पाहायला मिळते. श्रावण महिन्याचे धर्म, परंपरा, निसर्ग अशा विविध अर्थाने खूप महत्व आहे. यंदा मराठी दिनदर्शिकेनुसार 5 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरु होत आहे व 3 सप्टेंबरला संपत आहे.

श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून, नवविवाहांसाठी हा महिना म्हणजे माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते. शिवभक्तांसाठी या महिन्याला अतिशय महत्व आहे, कारण याच महिन्यात दर सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत करून शंकराची पूजा-अर्चना केली जाते.

तर अशा या श्रावणमासारंभ निमित्त तुम्ही काही खास Wishes, Whatsapp Status, HD Images, Quotes, Greetings, SMS द्वारे आपल्या मित्र-परिवारास शुभेच्छा देऊ शकता.

Happy Shravan Maas 2024 Messages
Happy Shravan Maas 2024 Messages
Happy Shravan Maas 2024 Messages
Happy Shravan Maas 2024 Messages
Happy Shravan Maas 2024 Messages

दरम्यान, बहुतेक हिंदू श्रावणातील सोमवारी शंकराची तर मंगळवारी देवी पार्वतीची उपासना करतात. श्रद्धेनुसार असे मानण्यात येते की, प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जातात आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे. पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे श्रावण महिन्यात समुद्र मंथन झाले होते. त्याचवेळी समुद्रातून निघालेले विष पिऊन शंकराने सृष्टीची रक्षा केली होती.