
Happy Republic Day 2020 Images: प्रत्येक भारतीय नागरिकासाठी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन राष्ट्रीय सण अतिशय महत्त्वाचे ठरतात. पैकी स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला साजरा केला जातो. तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला. यंदाच्या वर्षी म्हणजेच 26 जानेवारी 2020 या दिवशी भारत आपला 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सरकारी कार्यालयं, संस्था, सार्वजनिक ठिकाणं, आणि शाळा महाविद्यालयांमधून ध्वजारोहण केले जाते. त्यामुळे आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा असतो. आपल्या भारतभूमीला वंदन करण्याचा, आपल्या मातृभूमीचा वंदन करण्याचा हा दिवस. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम होत असले तरी प्रत्येकाच्या मनात भावना एकच असते देशप्रेम. अशा या ऐतिहासिक दिनी देशभरातील नागरिक आपल्या मित्र, आप्तेष्ठ आणि सहकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. आपणही आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी HD Greetings, HD Wallpapers, HD Wishes देण्यासाठी खास इमेजेस.
प्रजासत्ताक दिन 2020 शुभेच्छा एचडी इमेज

प्रजासत्ताक दिन 2020 शुभेच्छा एचडी इमेज

प्रजासत्ताक दिन 2020 शुभेच्छा एचडी इमेज

प्रजासत्ताक दिन 2020 शुभेच्छा एचडी इमेज

प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून साधारण तीन वर्षांनी भारताला स्वत:ची अशी स्वतंत्र राज्यघटना म्हणजेच संविधान मिळाले. तत्पूर्वी 26 नोव्हेंबर इ.स. 1949 रोजी घटना समितीने भारताचे संविधान स्वीकारले होते. त्यानंतर भारत सरकारने 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय जनतेला हे संविधान सुपूर्त केले. दरम्यान, 26 जानेवारीलाच हे संविधान का स्वीकारले? या प्रश्नाचे उत्तर असे की, लाहोर अधिवेशनात पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी 26 जानेवारी 1930 या दिवशी तिरंगा फडकावत संपूर्ण (स्वातंत्र्याची) घोषणा केली. या दिवसाची आठवण म्हणूनच 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारतात राज्य घटना अंमलात आणण्याचा दिवस ठरवला गेला. तेव्हापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.