Happy Ram Navami Marathi Wishes: श्रीविष्णूचा सातवा अवतार म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या प्रभू श्रीरामांचा जन्म ज्या दिवशी झाला त्याला रामनवमी असे म्हणतात. चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रनवरात्रीतील शेवटचा म्हणजेच नववा दिवस असतो. प्रभु श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी, गुणवान पुत्र, राजधर्मचारी, होते आणि हे सगळे गुण त्यांच्या अंगी असुन देखील या सर्व गोष्टींच्या त्यांना क्वचित देखील अहंकार नव्हता. संस्कृतिरक्षक श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. त्याच्यातील गुण आपल्याला कसे अंगिकारता येतील या साठी श्रीरामाची शिकवण जाणली पाहिजे. अशा या महान देवाचा जन्मदिवस सर्व हिंदू बांधव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात.
असे म्हणताता या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला. कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. अशा या चैतन्यमयी दिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी रामनवमीचे खास ग्रीटिंग्स:
हेदेखील वाचा- Ram Navami 2019: रामनवमी का साजरी करतात?
रामनवमीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. पूर्ण दिवस भजन स्मरण, स्तोत्रपाठ, हवन करून उत्सव साजरा करण्यात येतो.’श्री राम जयराम जयजयराम’ या मंत्राचा नित्य जाप केला जातो. या दिवशी हेच सध्याच्या कलियुगात प्रभू राम बनता आलं नाही तरीही गुण अंगिकारण्याचा प्रत्येक पुरुषाने संकल्प करायला काही हरकत नाही.