
रक्षाबंधन (Raksha Bandhan). भाऊ आणि बहिण यांच्या प्रेमाचा सन्मान करणारा हा सण. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे बहिण भाऊ या दिवसाची (Raksha Bandhan 2022) मोठ्या आपुलकीने वाट पाहात असतात. भावाच्या हातात राखी बांधून प्रेमाणे मिळणारी ओवाळणी आणि त्या निमित्ताने होणारी दोघांची गळाभेट एकमेकांसाठी फार बोलकी आणि महत्त्वाची ठरते. आजकाल जमाना बदलला, नोकरी, व्यवसाय करिअर यांमुळे राहण्याची ठिकाणही बदलली त्यामुळे सण उत्सव साजरे करण्यातही बराच बदल झाला. असे असले तरी हे नातेही बंध कायम ठेऊन सण साजरे करण्याची पद्धती काहीशी बदलताना दिसते. जसे की एकमेकांना आणि आपल्या आप्तेष्टांना या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी खास करुन डिजिटल माध्यमांचा वापर केला जाऊ लागला. जसे की, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि इतर बरेच प्रकार. सोशल मीडियाच्या माध्यमातून Raksha Bandhan HD Greetings, Wallpapers, Wishes Images शेअर करुन लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणही देऊ शकता. त्यासाठी खास रक्षाबंधन एचडी इमेजेस इथे देत आहोत.
रक्षाबंधन हा सण पूर्वंपार आपल्याकडे चालत आला आहे. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते. यामागची परंपरागत भावना अशी की, बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधावी आणि भावाने बहिणिला अखंड संरक्षणाचे वचन द्यावे. अर्थात आता काळ खूपच बदलला. महिला स्वयंभू झाल्या. अर्थकारण, समाजकारण आणि राजकारणही त्या स्वत: पाहू लागल्या. त्याचप्रमाणे त्या स्वत:ही स्वत:चे संरक्षण करण्याईतपत समर्थ झाल्या आहेत. असे असले तरी परंपरा मात्र आजही सुरु आहेत. अर्थात त्याला प्रेमाची किनार आहे हा भाग वेगळा.

रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधन सणानिमित्त बहिण भावाला ओवाळते. त्यासाठी भावाला एका पाटावर बसवले जाते. ती त्याच्या कपाळाला टीळा लावते. मग त्याला निरंजनाचे ताट घेऊन ओवाळते. मग त्याच्या हाता राखी बांधते. राखी बांधून झाली की भाऊ तिच्या ताटात ओवाळणी घालतो. ही ओवाळणी भावाच्या आर्थिक क्षमता आणि त्याची भावना यावर अवलंबून असते. कधी ती पैशांच्या रुपात असते, कधी एखादा दागिणा कधी एखादी भेटवस्तू असे त्याचे स्वरुप असते. अनेकदा बहिण ओवाळणीसाठी हट्टही करते. भाऊ जर वयाने मोठा असेल तर बहिण राखी बांधून झाल्यावर त्याचे दर्शन घेते.