Parshuram Jayanti 2021 Messages: परशुराम जयंतीनिमित्त हिंदी Quotes, WhatsApp Stickers, Facebook Greetings, GIF Images द्वारे आपल्या प्रियजनांना द्या शुभेच्छा
परशुराम जयंती 2021 (Photo Credits: File Image)

Parshuram Jayanti 2021 Messages in Hindi: दरवर्षी अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी परशुराम जयंती (Parshuram Jayanti) देखील साजरी केली जाते. भगवान परशुराम यांना संपूर्ण जगाचे संगोपन करणाऱ्या भगवान विष्णूचा (Lord Vishnu) सहावा अवतार मानला जातो. त्यांचा वाढदिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, परशुराम जयंती दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते आणि ही पवित्र तारीख आज, 14 मे आहे. पौराणिक मान्यतानुसार भगवान परशुराम यांचा जन्म प्रदोष काळात या पवित्र तारखेला झाला होता, म्हणून प्रदोष काळात त्यांची जयंती साजरी करणे खूप फलदायी मानली जाते. परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या प्रियजनांना या हिंदी मेसेजेस, कोट्स, व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स, फेसबुक ग्रीटिंग्ज, GIF फोटोंच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.

परशुरामांचा जन्म त्रेतायुगातील भार्गव घराण्यात झाला होता, त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी जमदग्नी होते, तर आईचे नाव रेणुका होते. परशुराम जयंतीनिमित्त भगवान परशुरामाची पूजा केल्यास पुण्य फळ मिळते आणि भगवान विष्णूंचाही आशीर्वाद मिळतो.

परशुराम जयंती 2021 (Photo Credits: File Image)
परशुराम जयंती 2021 (Photo Credits: File Image)
परशुराम जयंती 2021 (Photo Credits: File Image)
परशुराम जयंती 2021 (Photo Credits: File Image)
परशुराम जयंती 2021 (Photo Credits: File Image)

परशुराम यांना भगवान विष्णूचा सहावा अवतार मानला जातो आणि धार्मिक मान्यतांनुसार परशुराम हा एकमेव अवतार आहे जो पृथ्वीवर अद्याप जिवंत आहे. प्रचलित पौराणिक मान्यतांनुसार भगवान परशुरामांचा जन्म ब्राह्मण आणि ऋषींवरील अत्याचार संपवण्यासाठी झाला होता. असेही मानले जाते की ज्यांना मुलबाळ नाही त्यांनी या दिवशी उपास करावा व परशुरामांची पूजा करावी, याद्वारे त्यांना संतान सुखाचा आशीर्वाद मिळतो. दक्षिण भारतातील उडुपीजवळ परशुरामांचे मोठे मंदिर आहे. कल्की पुराणानुसार, जेव्हा कल्की, भगवान विष्णूचा 10वा अवतार तो कलयुगात अवतरणार तेव्हा परशुराम त्यांना शस्त्र विद्येची शिक्षा देतील. भगवान रामानंतर परशुराम भगवान विष्णूच्या अन्य अवतारांना भेटतील.