New Year Eve 2024 HD Images: नववर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नववर्षाच्या (New Year 2024) स्वागतासाठी देशभरात तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तसेच सध्या सर्वजण नाताळच्या सुट्टयांमध्ये धम्माल करण्यात व्यस्त आहे. दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस जगभरात ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो आणि या विशेष सणासोबतच लोक नवीन वर्षाची तयारीही सुरू करतात. ख्रिसमसच्या दिवसापासूनच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची प्रक्रिया सुरू असते. जर तुम्हाला तुमचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांचे विशेष प्रकारे नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
आज आम्ही तुमच्यासाठी खास नववर्षाच्या स्वागतासाठी सोशल मीडियावर पाठवण्यासाठी Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status घेऊन आलो आहोत. तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करून आपल्या मित्र-परिवारास नुतन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा -New Year 2023: भारतातील कोणत्या राज्यातील लोक नववर्षाला सर्वाधिक दारू पितात? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का? चला तर मग उत्तर जाणून घेऊयात)
नववर्षाची पूर्वसंध्या 2024 शुभेच्छा संदेश -
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नव वर्षाच्या पूर्वसंध्येला
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
नविन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
Happy New Year 2023!!
हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2023 चा प्रवास,
अशीच राहो 2024 मध्येही आपली साथ.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा,नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
विविध समुदाय त्यांच्या कॅलेंडरनुसार त्यांचे नवीन वर्ष वेगवेगळ्या प्रकारे साजरे करतात. विविध देशांतील लोक त्यांच्या परंपरा आणि चालीरीतींनुसार हा दिवस साजरा केला जातो.