
२०२२ हे वर्ष संपवून आपण २०२३ या नव्या वर्षात पदार्पंण करणार आहोत. नव्याने येणारं हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठीचं खास आहे. नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पध्दती असतात. कुणी नव्या वर्षात नवीन संकल्प करतात तर कुणी नवीन काम नवीन सवयींची सुरुवात करत नव्या वर्षाचा शुभारंभ करतात. पार्टी करत नव्या वर्षाचं स्वागत करणं हे सर्वात ठरलेलं सेलिब्रेशन. पण पार्टी करायसाठी लागतात ती आपली माणस. दोस्त-यार मित्र परिवाराविना कुठलीही पार्टी, सेलिब्रेशन अपूर्ण आहे आणि नवीन वर्ष पार्टीविना अपूर्ण आहे. पण हल्ली धकाधकीच्या काळत अशी तुमची बरिच माणसं आहेत जी तुमच्या सोबत वर्षानुवर्षापासून आहेत पण किंबहुना तुमच्या प्रत्येक नव्या वर्षाची सुरुवात त्यांच्याचं सोबत झाली आहे. पण आज ते तुमच्या सोबत, तुमच्या शहरात नाहीत. तरी नव्या वर्षाचं सिलिब्रेशन मात्र या माणसांशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही आज त्यांच्या सोबत नसलात तरी डिजिटल माध्यमातून तुम्ही त्यांच्यासाठी नवीनवर्षाच्या शुभेच्छा पाठवू शकता. अशाचं काही नवीन वर्षाच्या खास डिजीटल शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.
गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०२३ साल..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

सुख देवाच्या चरणी वाहू
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी!
