
Happy New Year 2021 Wishes: आज नववर्षाची पूर्व संध्या म्हणजेच 31 डिसेंबरचा दिवस!प्रत्येकालाचं नवीन वर्षाची उत्सुकता असते. सरत्या वर्षाला निरोप देऊन प्रत्येकजण आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल करत असतो. यातील अनेकजण नवीन वर्षानिमित्त वेगवेगळे संकल्प करतात. हे संकल्प ते वर्षभर पाळतात. 2020 या वर्षामध्ये भारतावरचं नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचं संकट होतं. मात्र, आता देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. आशा आहे की, 2021 मध्ये कोरोना विषाणू पूर्णता नष्ट होईल आणि तुमचं हे वर्ष सुखी व आनंदाने जाईल. New Year 2021 Wishes In Marathi: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Messages WhatsApp, Facebook द्वारा शेअर करून खास करा नववर्षाचा पहिला दिवस.
ग्रेगरीय कॅलेंडरच्या 2021 या नववर्षाची सुरूवात यंदा 1 जानेवारी दिवशी होणार आहे. यंदा नववर्षाच्या स्वागतावर कोरोना विषाणूचं सावट असणार आहे. मात्र, तरीदेखील तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप स्टेट्स, मेसेंजर यांच्या माध्यमातून New Year SMS, Greetings, Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील शुभेच्छापत्र उपयोगी येतील. (हेही वाचा - January 2021 Festival Calendar: जानेवारी 2021 महिन्यातील 'हे' दिवस महत्त्वाचे; जाणून घ्या सण आणि उपवासाच्या तारखा)
पुन्हा एक नवं वर्ष
पुन्हा एक नवी आशा
तुमच्या आयुष्याला मिळो
पुन्हा एक नवी दिशा
नवी स्वप्न, नवी क्षितिजं
सोबत माझ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा छान!
नूतनवर्षाभिनंदन!

चला नवीन वर्षाचे स्वागत करुया
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल
या नव्या वर्षात येणाऱ्या बदलांना सकारात्मकतेने स्वीकारण्यासाठी
ऑल द बेस्ट !

येवो सुख, समृद्धी तुमच्या अंगणी
वाढो आनंद तुमच्या जीवनी
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजची पहाट घेऊन आली नवे वर्ष नवीन आशा
या वर्षात तुमच्या भविष्याला मिळूदे तुमच्या मनासारखी दिशा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ध्येयावर लक्ष केंद्रित करून चालणारी व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते
तुमचे ध्येय पूर्ण होवो हीच आमची सदिच्छा
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 2021 या नववर्षाची सुरूवात 1 जानेवारी पासून होणार आहे. या दिवशी सर्वजण आपल्या जवळच्या व्यक्तींना तसेच नातेवाईंकांना नव वर्षाच्या शुभेच्छा देतात. या दिवशी नागरिक प्रार्थनास्थळांना भेट देऊन पुढील वर्षभरासाठी सुख, समृद्धी, आनंदासोबतच सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करतात. तुम्हाला यंदाचं आयुष्य सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावं हिचं सदिच्छा.