
वर्ष 2021ला अलविदा म्हणत आता 2022 च्या स्वागतासाठी सारे सज्ज आहेत. ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार नव्या वर्षाची सुरूवात 1 जानेवारीला होते. मागील दोन वर्षांप्रमाणे यंदा नववर्षाच्या स्वागतावर कोविड 19 संकटाचं सावट आहे. जगात ओमिक्रॉन व्हेरिएंट धुमाकूळ घालत असल्याने भारतात अनावश्यक गर्दी टाळत साधेपणाने 2022 चं स्वागत करण्याचा प्लॅन आहे. यंदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मित्रमंडळी, आप्तजनांना भेटू शकत नसलात तरीही सोशल मीडीयामध्ये Facebook Messages, WhatsApp Status, Quotes, Wishes, GIFs द्वारा तुम्ही नववर्षाच्या शुभेच्छा नक्कीच शेअर करून 2022 च्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेली ग्रिटिंग्स,HD Images तुम्ही डाऊनलोड करून सोशल मीडीयात ती नक्कीच शेअर करू शकता. शनिवार 1 जानेवारीला यंदा नव्या वर्षाची सुरूवात होत आहे. मग यावर्षी व्हर्च्युअली या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रं. हे देखील वाचा: New Year 2022 Good Luck: घरात आनंदाचे वातावरण पाहिजे असल्यास, या गोष्टी करुन पाहा .
2022 नववर्षाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रिटींग्स

- 2022 हे नवं वर्ष खूप सारा आनंद, स्वप्नपूर्तीचे क्षण
निरामय आरोग्य आणि समाधान घेऊन येवो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

- हॅप्पी न्यू इयर

- नववर्षाच्या पहाटेला तुमचं
आयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
2022 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

- 2022 वर्षाचं स्वागत करूया
मागील वर्षी अधुर्या राहिलेल्या स्वप्नांना नव्याने फुलवूया
हॅप्पी न्यू इयर

- पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा
तुमच्या कतृत्वाला, पुन्हा एक नवी दिशा
नूतन वर्षाभिनंदन

- गेलं ते वर्ष गेला तो काळ
नव्या आशा, अपेक्षा घेऊन आलं 2022 हे सालं
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अनेकजण नववर्षाच्या सुरूवातीला एक नवी उमेद म्हणून पाहतात. आशा, अपेक्षांना पूर्तता देण्यासाठी अजून एक संधी म्हणून पाहतात. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत तुमच्या जवळच्या लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत त्यांची नव्या वर्षाची सुरूवात एक सकारात्मकतेने करायला विसरू नका.