Narasimha Jayanti 2020 Marathi Wishes: नृसिंह अवतार हा विष्णूच्या (Lord Vishnu) दशावतारांपैकी चौथा अवतार म्हणून ओळखला जातो. हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी आणि आपला भक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला असे म्हणतात, हिंदू कालदर्शिकेनुसार हा दिवस वैशाख शुद्ध चतुर्दशीचा होता त्यामुळे दरवर्षी या दिवशी नृसिंह जयंती (Narasimha Jayanti) साजरी केली जाते. यंदा ही जयंती 6 मे रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपल्या मित्रांंना, नातेवाईकांना, कुटुंबाला शुभेच्छा देऊन तुम्ही हा सोहळा आणखीनच खास करून शकता त्यासाठी आम्ही काही मराठी शुभेच्छापत्र तयार केली आहेत, हे मराठी संदेश, Messages, Greetings च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून तुम्ही तुमच्या सदिच्छा सर्वांपर्यंत पोहचवू शकाल.
भगवान नृसिंह हे शक्ती आणि परक्रमाची देवता म्ह्णून ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्या स्मरणाने आपल्यालाही बळ मिळावे या हेतूने पूजन केले जाते.
नृसिंह जयंतीच्या शुभेच्छा
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे !
उपवासं करिष्यामि सर्वभोग विवर्जिता:!!
नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
श्रीविष्णूंचे अवतार भगवान नृसिंह जयंतीच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।।
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
श्रीहरी विष्णूचे चौथे अवतार
शक्तीची देवता, दृष्टाचें मारक
भगवान नृसिंह यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
शक्ती व पराक्रमाची देवता
श्री नरसिंह भगवान
यांच्या जयंती निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
नरसिंह अवतार विषयी एक आख्यायीका आपण जाणून असाल, वडील हिरण्यकश्यपू हा राक्षस असतानाही त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा मोठा भक्त होता. मात्र हिरण्यकश्यपूला हे मान्य नव्हते. म्हणुनच त्याने प्रल्हादाचा छळ करायला सुरुवात केली, हत्तीच्या पायदळी देणे, उकळत्या तेलात टाकणे,कड्यावरुन फेकुन देणे असे क्रुर प्रकार त्याने केले,तरीही प्रल्हादाच्या मनातील विष्णु भक्ती कमी झाली नाही.
या भक्ताची साद ऐकुन शेवटी श्रीविष्णु यांंनी खांंबातुन प्रकट होट नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपु याला आपल्या मांडीवर घेउन त्याचे पोट फाडुन वध केला. या दिनाच्या निमित्त साजऱ्या होणाऱ्या नृसिंह जयंतीच्या तुम्हा वाचकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा!