Nag Panchami Wishes in Marathi: नागपंचमी (Nag Panchami 2020) हा श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. दरम्यान, प्रत्येकजण एकमेकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देतात. मात्र, या नागपंचमीला आपल्या मित्रांना, परिवारला आणि नातेवाईकांच्या आनंदात आणखी भर घालण्यासाठी खालील सुंदर फोटो (HD Images, Quotes and Wallpapers) उपयोगी ठरणार आहेत.
या दिवशी नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते. नागपंचमीबद्दल पुष्कळ कथा आहेत. एक म्हणजे श्रीकृष्णाने कालिया नावाच्या नागाचा पराभव केला आणि तो यमुनेच्या डोहातून सुखरुप बाहेर पडला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता, असे मानले जाते. हे देखील वाचा-Naag Panchami 2020 Mehendi Designs: नाग पंचमी निमित्त सोप्प्या आणि आकर्षक मेहंदी डिझाइन्स हातावर काढून साजरा करा सण
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा-
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा-
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा-
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा-
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये इत्यादी संकेत पाळावेत. या दिवशी भूमीखनन करू नये, असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात नागपंचमीला जेवण बनवताना त्यामध्ये चिरलेल्या, तळलेल्या, कपलेल्या जिन्नासांचा वापर करू नये, अशी देखील प्रथा काहीजण पाळतात. त्यामुळे राज्यभरात नागपंचमी दिवशी जेवणात अनेक खास पदार्थ दिसतात. दरम्यान काही जणी नागपंचमी दिवशी भावासाठी देखील एका दिवसाचा उपवास करून हे व्रत करतात.