Mehandi Designs (Photo Credits: Pixabay)

Naag Panchami 2020 Mehendi Designs: श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर विविध सणांची सुरुवात होते. त्यामुळे सर्वत्र आनंदासह प्रसन्न वातावरण दिसून येते. या सणांच्या दिवसात विवाहित महिलांपासून ते घरातील लहान मंडळी सुद्धा सण साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. श्रावणातील बहुतांश सणांचे ऐतिहासिक महत्व असून ते कथांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या पुढे पोहचवले जाते.याच दरम्यान येत्या 25 जुलै रोजी महाराष्ट्रात नाग पंचमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी नागदेवतेची पुजा केली जाते. तसेच नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य ही दाखवला जातो.(Nag Panchami 2020 Special Recipes: नागपंचमी निमित्त पातोळ्या, पुरणाचे दिंड नैवैद्याला कसे बनवाल?)

तर यंदाच्या नागपंचमीचा सण कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार नाही आहे. परंतु महिलांना सणानिमित्त नटण्याथटण्याची फार आवड असते. त्यामुळे तुम्ही नागपंचमीच्या दिनाचे औचित्य साधत हातावर सुंदर अशी मेहंदी काढून सण साजरा करु शकता. तर पहा सोप्प्या आणि आकर्षक मेहंदी डिझाईन्स(Nag Panchami 2020 Date: नाग पंचमी दिवशी यंदा पूजा कशी कराल?)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mehandi designs (@awesomemehandi) on

 

View this post on Instagram

 

A post shared by mehandi fans (@_mehandi_designs_world_) on

महाराष्ट्रात नागपंचमीला जेवण बनवताना त्यामध्ये चिरलेल्या, तळलेल्या, कपलेल्या जिन्नासांचा वापर करू नये अशी देखील प्रथा काहीजण पाळतात. त्यामुळे राज्यभरात नागपंचमी दिवशी जेवणात अनेक खास पदार्थ दिसतात. दरम्यान काही जणी नागपंचमी दिवशी भावासाठी देखील एका दिवसाचा उपवास करून हे व्रत करतात.