मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे (Mother's Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा मदर्स डे 12 मे दिवशी आहे. जगभरात हा दिवस आई प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. भारतीय संस्कृती मध्ये आईला विशेष स्थान आहे. आई वडिलांना देवासमान स्थान असल्याने त्यांचा आदर रोजच राखण्याचे संस्कार केले जातात. पण आईबद्दल असलेली कृतज्ञता बोलून दाखवण्यासाठी मदर्स डे हा खास दिवस असतो. मग तुमच्या आईचा देखील हा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी तुम्ही सोशल मीडीयात Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images, Quotes द्वारा शुभेच्छापत्र शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.
मदर्स डे च्या निमित्ताने तुम्ही खास सेलिब्रेशन करू शकाल. रविवारचा दिवस असल्याने तुम्ही कुटुंबासोबत एकत्र हा दिवस साजरा करू शकता. तुमच्या आई सोबत हा एक दिवस तिला आवडणार्या गोष्टी करून साजरा करू शकता. Mother's Day Card Ideas For Kids: Mother's Day निमित्त हाताने बनवा हटके ग्रीटिंग, इथे पाहा व्हिडीओ .
मदर्स डे च्या शुभेच्छा
आई ही घरातील हक्काची व्यक्ती असते त्यामुळे कळत नकळत आपण तिला गृहित धरतो. त्यामुळे आजच्या या मदर्स डे च्या निमित्ताने तिला तिच्या रोजच्या कामांमधून थोडा ब्रेक द्या आणि आजचा दिवस तिच्यासाठी संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करा.