
Happy Men's Day 2020 Wishes in Marathi: 8 मार्चला जसा वूमन्स डे अर्थात महिला दिन साजरा होतो तसा जगभरात 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरूष दिन(International Men's Day) म्हणून साजरा केला जातो. संसार रूपी गाड्याची स्त्री आणि पुरुष ही दोन चक्र मानली जातात. जागतिक पुरूष दिनाचं (Men's Day) औचित्य साधत त्यांच्या आरोग्याबद्दल, समाजातील सकारात्मक दृष्टीकोनाबाबत सजगता, जागृतकता निर्माण करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा केला जातो. पण जागतिक महिला दिनाच्या तुलनेत पुरूष दिनाच्या सेलिब्रेशनचा आवाज थोडा कमी असतो. मग यंदा जागतिक पुरूष दिनाबद्दल समाजात जागृकता निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना, बॉयफ्रेंडला, पतीला, वडिलांना किंवा अन्य कोणत्याही पुरूषाला हॅप्पी मेन्स डे च्या शुभेच्छा पाठवू शकता. व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook), ट्वीटर (Twitter), इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून मराठमोळे जागतिक पुरूष दिनाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस, Wishes, Greetings, GIFs, WhatsApp Stickers, HD Images शेअर करत आज तुमच्या आयुष्यातील स्पेशल पुरूषाचा दिवस खास करू शकता. November 2020 Festivals Calendar: नोव्हेंबर महिन्यात यंदा दिवाळी, तुलसी विवाह ते अगदी त्रिपुरारी पौर्णिमेची धूम पहा सार्या सणांची यादी.
जागतिक पुरूष दिन साजरा करण्यामागील एक उद्देश म्हणजे पुरूषांना शारिरीक, मानसिक दृष्ट्या होत असलेल्या त्रास, समस्यांबाबत जागृती निर्माण करण्याचा दिवस. पुरूषांमधील वाढत्या आत्महत्या असतील किंवा अगदी सिंगल मेल पेरंट्स म्हणून जबाबदारी निभावताना कोणारी कसरत त्यांच्या अनेक लहान सहान गोष्टींच्या, समस्येचा ठाव घेण्यासाठी मेन्स डे खास आहे. या दिवसाच्या निमित्ताने काही कार्य्क्रम आयोजित केले जातात. काही चर्चासत्र असतात. पण तुमच्या आयुष्यातील पुरूषांना जर 'स्पेशल फिलिंग' अनुभवण्याचा दिवस करायचा तुमचा प्लॅन असेल तर त्या दिवसाची सुरूवात अअज मेसेज शेअर कर्त करा.
जागतिक पुरूष दिनाच्या शुभेच्छा

बाहेरून 'सुपरमॅन'
पण आतून 'जेंटलमॅन'
असणार्या प्रत्येक पुरूषाला
जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

घराचा खंबीर आधार असणार्या
प्रत्येक पुरूषाला
इंटरनॅशनल मेन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी इंटरनॅशनल मेन्स डे!

जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व पुरुष मंडळीना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
इंटरनॅशनल मेन्स डे च्या शुभेच्छा तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस, स्टिकर्सच्या माध्यमातूनही देऊ शकता. त्यासाठी तुम्हांला खास व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पॅक गूगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावा लागणार आहे.
तुमच्या आयुष्यातील पुरूषांचा यंदा मेन्स डे खास करण्यासोबतच हे मेसेजेस, विशेस तुम्ही सोशल मीडीयात शेअर देखील करू शकता. यामुळे पुरूषांसाठी असलेल्या या दिवसाबद्दल सजगता निर्माण होण्यासही मदत होईल.