
जसा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होतो, तसाच दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men's Day) साजरा केला जातो. अनेकांना याबाबत माहितीही नसेल. 19 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा होतो. मात्र, ज्या प्रकारचा उत्साह आणि सपोर्ट महिला दिनाला मिळतो, त्यामानाने पुरुष दिनावेळी लोक थोडे कमी उत्साही असतात. हा दिवस मुख्यत: पुरुषांचा भेदभाव, शोषण, दडपशाही, हिंसाचार आणि असमानता यांच्याविरुद्ध आणि पुरुषांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 19 नोव्हेंबरला 80 देशांमध्ये साजरा केला जातो आणि त्याला युनेस्कोनेही पाठिंबा दर्शविला आहे.
पुरुषांच्या बाबत समाजात अनेक गैरसमज आहेत, त्यातील एक म्हणजे पुरुषाने नेहमीच कणखर राहिले पाहिजे. मात्र हे चुकीचे आहे, पुरुषांनाही स्त्रियांप्रमाणे भावना असतात, तेही भावनिक असतात, त्यांनाही रडू येते व महत्वाचे म्हणजे त्यांनाही मदतीची, पाठिंब्याची आवश्यकता असते. तर याच गोष्टी अधोरेखित करण्यासाठी जगभरात ‘जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो’. तर या दिवसाचे औचित्य साधूंन, मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून द्या तुमच्या जीवनातील महत्वाच्या पुरुषांना शुभेच्छा.






आंतरराष्ट्रीय पुरुष दिन प्रामुख्याने पुरुष आणि मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, स्त्री-पुरुष समानता सुधारण्यासाठी, लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी आणि पुरुष रोल मॉडेल्सना हायलाइट करण्यासाठी साजरा केला जातो. (हेही वाचा: जागतिक पुरूष दिनाच्या शुभेच्छा, मराठी संदेश, Quotes, Images द्वारा शेअर करत खास करा प्रत्येक पुरूषाचा आजचा दिवस)
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात 7 फेब्रुवारी 1992 रोजी थॉमस ऑस्टर यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची कल्पना त्याआधी एका वर्षापूर्वी 8 फेब्रुवारी 1991 रोजी चर्चिली गेली होती. त्यानंतर, 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये पुन्हा हा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 2007 मध्ये भारताने प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला. तेव्हापासून भारतात दरवर्षी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.