
Maharashtra Din Messages in Marathi: ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ अशा अनेक संतांच्या आचारांनी, विचारांनी पावन झालेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. याच ठिकाणी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा लिहिली गेली. अनेक महात्मे, स्वातंत्र्यसैनिकांना इथल्या भूमीने जन्म दिला. अशा या महान महाराष्ट्राला 1 मे 1960 रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्राची कमान यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपविली. याच दिवसाची आठवण म्हणून उद्या राज्यभरात उत्साहाने ‘महाराष्ट्र दिन’ (Maharashtra Din 2022) साजरा होत आहे.
महाराष्ट्राचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक योगदान फार मोठे आहे. छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली आणि पेशव्यांनी महाराष्ट्राचा हा ध्वज अटकेच्या नेला. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी यांनी याच महाराष्ट्रात पारतंत्र्या विरुद्ध सशस्त्र उठाव केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातच शिक्षणाचे बीज रोवले, तर टिळकांनी याच महाराष्ट्रातून इंग्रजी सत्तेला आवाहन दिले. याच महाराष्ट्राने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने देशाच्या संविधानाला आकार दिला.
तर या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही खास मराठी Wishes, Greetings, Messages, Images च्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.





दरम्यान, 1956 मध्ये राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषावार प्रांतरचना केली. पुढे महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये 25 एप्रिल 1960 रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार अस्तित्त्वात आली. त्यानंतर 1 मे 1960 रोजी हा कायदा अंमलात आला.
(हेही वाचा: Maharashtra Day 2022 Date, History & Significance:महाराष्ट्र दिनाचा इतिहास, पाहा)
दुसरीकडे, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. मुंबईच्या महाराष्ट्रातील विलीनीकरणासाठी 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला. या मोर्चात गोळीबार झाला व 106 आंदोलकांना हौतात्म्य आले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे, 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.