
Kojagiri Purnima Messages in Marathi: शरद ऋतू आणि अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा! हिंदू धर्मीयांसाठी या कोजागिरी पौर्णिमेला (Kojagiri Purnima) लक्ष्मी मातेचे पुजन करण्यासोबतच मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत चंद्राच्या शीतल प्रकाशात दूध आटवून मसाले दुध पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. यंदा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा (Sharad Purnima) 30 ऑक्टोबर दिवशी साजरी केली जाणार आहे. कौमुदिनी पौर्णिमा म्हणून देखील ओळख असलेल्या या सणाची धामधूम यंदा तुम्हांला मोजक्याच लोकांसोबत करता येणार आहे. पण तुम्ही कोविड 19 आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे मोठया ग्रुपला मिस करत असाल तर त्यांना यंदा व्हॉट्सअॅप मेसेज(WhatsApp Messages), फेसबूक स्टेटस (Facebook Status) द्वारे कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा देत सेलिब्रेशनमध्ये सामावून घेऊ शकता. इंटरनेटमुळे जग जवळ आलं असल्याने आता तुम्हांला यंदा दूर राहून सण साजरी करायची पद्धत अंगवळणी पडली असेल. म्हणून कोजागिरीला कोणीही दूर, नाराज राहू नये म्हणून तुम्ही त्यांना आजच सोशल मीडियात कोजागिरीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा, मराठी संदेश, Wishes,SMS, Quotes शेअर करून या शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता. Kojagiri Purnima Milk Recipe : कोजागिरीच्या रात्री असे बनवा 'कोजागिरी स्पेशल मसाला दूध' जाणून घ्या सोपी रेसेपी.
हिंदू पुराणकथांनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर येते. जो मनुष्य जागा असेल त्याला सुख, शांती समृद्धी द्ते. तसेच कोजागिरी पौर्णिमा हा माता लक्ष्मीचा जन्म दिवसही मानला जातो. याच दिवशी समुद्रमंथनातून ती प्रकटली अशी धारणा आहे. म्हणून या मंगलमयी दिवसाचा आनंद तुमच्या मित्रपरिवार, आप्तेष्ट, प्रियजनांसोबत द्विगुणित करण्यासाठी लेटेस्टली मराठी च्या टीमने बनवलेली ही मराठमोळी शुभेच्च्छापत्र शेअर करा.
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

चंद्राच्या शीतल छायेत
चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात
केशरी दुध साखरेप्रमाणे
गोडवा वाढो तुमच्या आमच्या नात्यात
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रकाश चंद्राचा
आस्वाद मसाले दुधाचा
आनंदाने साजरा करू
सण कोजागिरी रात्रीचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आला शरद ऋतू
आभाळात चंद्रासह चांदणं
मसाले दुधाचा प्याला हाती
सारीकडे आज सणाचा आनंदी आनंद
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुम्हांला
दीर्घायुष्य देणारी, सुख, शांती समाधान, समृद्धीची भरभराट
करणारी ठरो हीच आमची कामना
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा ही सण आणी धार्मिक दृष्ट्या जितकी महत्त्वाची आणि पुजनीय आहे तितकीच ती आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची असल्याचं समजलं जातं. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमय गुणांनी युक्त असतात. असा मानस आहे. त्यामुळे या रात्रीच्या शीतल चंद्रप्रकशात ठेवलेलें दूध हे औषधी गुणांनी युक्त अढिक परिणामकारक असल्याचं समजलं जात.
सर्वसामान्यपणे कोजागिरीची रात्र ही गाणी गात, खेळ खेळत जागवली जाते. यामध्ये चंद्राच्या प्रकाशातच दूध आटवून त्याचि खीर किंवा मसाले दूध केले जाते. नंतर प्रसाद म्हणून ते पिण्याची पद्धत आहे.