
वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. त्यापैकी आषाढी एकादशी (Ashadi ekadashi) आणि कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) या दोन अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. आषाढी कार्तिकी एकादशीला वारकरी सांप्रदाय पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल दर्शन घेतात आणि चंद्रभागेत स्नान करतात. यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे आषाढी कार्तिकी परंपरेप्रमाने दिंडी काढून साजरी झाली नाही. कार्तिकी एकादशीवरही मर्यादा आहेत. आषाढी एकादशीप्रमाणेच यंदा कार्तिकी एकादशीही पंढरपूर येथे गर्दी न करता घरीच साजरी करा असे अवाहन राज्य सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी इथे Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, Greeting देत आहोत. जे शेअर करुन आपण कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) निमित्त आपल्या मित्र मंडळी, आप्तेष्ट आणि वारकरी सांप्रदाय यांच्यासह आपला आनंद, भावना व्यक्त करा.
प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्ष असे मिळून संपूर्ण वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. परंतू, एखाद्या वर्षी आधिक मास येतो. आधिक मास आल्यास दोन एकादशी अधिक येतात. सर्व एकादशींमध्ये आषाढी आणि एकादशीला अधिक महत्त्व असते. आषाढी एकादशी शायनी एकादशी व कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. (हेही वाचा, Kartiki Ekadashi 2020 Messages in Marathi: कार्तिकी एकादशी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Stickers शेअर करुन मंगलमय करा दिवस!)






वारकरी सांप्रदाय आणि पुरानांचा दाखला देऊन सांगितले जाते की कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात. सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात. म्हणूनच या एकादशीला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हटले जाते.