Krishna Janmashtami 2020 Date: श्रावण कृष्ण अष्टमी च्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो. यंदा 11 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजेच जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने वृंदावन (Vrindavan), गोकूळ (Gokul), मथुरा (Mathura) , द्वारका (Dwarka), जन्नाथपुरी (Jagnathpuri) येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंंबईत सुद्धा जुहुच्या (Juhu) इस्कॉन मंंदिरात (Isckon Temple) यानिमित्ताने मोठा सोहळा आयोजित केला जातो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सणांंचं सेलिब्रेशन रद्द झालंय. मात्र मंदिरं बंद असली तरी श्रीकृष्ण जन्मोत्सव घरात साजरा केला जाऊ शकतोच, कृष्णाच्या जन्माचा सोहळा पारंंपारिक पद्धतीने घरी साजरा करुन त्या नंंतर आपल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक व सर्व प्रियजनांंना शुभेच्छा देउन आपण या सेलिब्रेशनला चारचांद लावु शकता. यासाठी काही मराठी शुभेच्छापत्र, Wishes, आम्ही तयार केल्या आहेत हे फोटो डाउनलोड करुन Whatsapp Status वर शेअर करु शकता.
श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या मराठी शुभेच्छा
कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी
जगोद्धारा धरी यशोदा पाळण्याची दोरी
जय श्री कृष्णा!
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
यमुनातीरी उभ्या गवळणी
रुप घेती तयाचे नयनी भरुनी
मोहन कुंंजविहारी माझा
गोकुळीचा राजा
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खुप शुभेच्छा!
वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं |
देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ||
गोकुळाष्टमीच्या मनःपुर्वक शुभेच्छा
गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा
श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला निमित्त
सर्वांना खुप शुभेच्छा
रंग निळा, मोर पंखी,वाजवी बासरी
साद ऐकुनी राधा होई बावरी
गोकुळ फुलले ज्याचे रुप पाहुनी
कृष्ण श्वास, कृष्ण आस, कृष्ण सदैव अंतरी
सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
श्रीकृष्ण जन्मोत्सवादिवशी दिवसभर उपवास केले जातात. रात्री कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. त्यामुळे यंदा 11 ऑगस्ट दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी उपवास ठेवले जाणार आहेत तर 12 ऑगस्टला या व्रताची सांगता होईल.हे व्रत करणार असाल तर त्या निमित्ताने यंदा भगवतगीता पठण करुन सण साजरा करता येईल. तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या शुभेच्छा!