
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men's Day)हा दरवर्षी 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो. पुरूषाचं समाजातील, कुटुंब व्यवस्थेतील योगदान अधोरेखित करण्यासाठी जागतिक पुरूष दिन साजरा केला जातो. 8 मार्च हा दिवस जसा स्त्रियांच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तसा 19 नोव्हेंबर हा पुरूषांसाठी खास आहे. मग यंदा तुमच्या आयुष्यातील खास पुरूषांसाठी देखील हा दिवस स्पेशल करायचा असेल तर तुम्ही त्यांना WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes द्वारा शुभेच्छा देत हा दिवस खास करू शकाल. जागतिक पुरूष दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खालील ग्रिटिंग्स देखील तुम्ही नक्की शेअर करू शकाल.
1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम टेलुकसिंग यांनी त्यांच्या वडिलांच्या जयंती स्मरणार्थ पहिला जागतिक पुरूष दिन साजरा केला होता. पुढे प्रत्येकाला या दिवसाचा उपयोग पुरुष आणि मुलांशी संबंधित समस्या मांडण्यासाठी प्रोत्साहित केले. थॉमस ओस्टर यांनी 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे सेलिब्रेशन सुरू केले आहे. मूलभूत मानवतावादी मूल्ये आणि पुरुषांबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा अंतिम उद्देश आहे. आता केंद्रीय शासकीय पुरूष कर्मचार्यांनाही मिळणार 730 दिवसांची Child Care Leave .
जागतिक पुरूष दिनाच्या शुभेच्छा

बाहेरून 'सुपरमॅन'
पण आतून 'जेंटलमॅन'
असणार्या प्रत्येक पुरूषाला
जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

Mens Day 2023 | File Imageघराचा खंबीर आधार असणार्या
प्रत्येक पुरूषाला
इंटरनॅशनल मेन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी इंटरनॅशनल मेन्स डे!

सर्व पुरुष मंडळीना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा!
समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणासाठी पुरुषांचे योगदान साजरे करणे या सहा स्तंभांवर जागतिक पुरूष दिनाचं महत्त्व आहे. “ZERO MALE SUICIDE” या थीम वर आधारित जागतिक पुरूष दिनाचं सेलिब्रेशन केले जाणार आहे. जगभरात या दिवसाचं औचित्य साधून पुरुष आणि मुलाशी संबंधित समस्यांवर चर्चा केली जाते, समस्यांवर चर्चा केली जाते आणि जागरूकता निर्माण केली जाते.