
संपूर्ण जगभरात हा आठवडा प्रेमाचा आठवडा, 'व्हॅलेंटाईन वीक' (Valentine Week) म्हणून साजरा केला जात आहे. तसे पहिले तर प्रेमासाठी 365 दिवस सारखेच असतात. मात्र 'व्हॅलेंटाईन डे'ची मजा काही औरच. या संपूर्ण आठवड्यात रोझ डे, त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि अखेर व्हॅलेंटाईन डे असे दिवस साजरे केले जातात.
हे सर्व दिवस तुमचे नाते बहरण्यास मदत करतात. या प्रत्येक दिवसाची एक खासियत आहे त्यामुळे नात्यामधील प्रेम, विश्वास, जवळीकता वृद्धिंगत होते. या सप्ताहामध्ये आज 'हग डे' (Hug Day) म्हणजेच आलिंगन दिवस साजरा केला जात आहे.
या दिवशी आपल्या जवळच्या, खास व्यक्तींना मिठी मारून मनातली भावना व्यक्त केली जाते. मिठी ही फक्त रोमँटिकच असावी असे नाही. तुम्ही आदराची, मायेची, जवळीकतेची मिठी मारूनही हा दिवस साजरा करू शकता. खास लोकांना HD Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करू शकता.





दरम्यान, रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरूवात झाली 496 मध्ये झाली. आता तर या दिवसाला जागतिक स्वरूप आले आहे. गुलाबाची फुले, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू अशा अनेक गोष्टींच्या मदतीने ही प्रेमाचा वीक साजरा केला जात आहे.