Holi Wishes | File Image

महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होलिका दहनाचा (Holika Dahan) दिवस अर्थातच होळी (Holi)  म्हणून साजरा केला जातो. यंदा होळी 6 मार्च दिवशी साजरी केली जाणार आहे. सारे अरिष्ट, नकारात्मक विचार, दु:खाची होळीमध्ये राख होऊ दे आणि धुळवडीपासून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे रंग उधळू दे अशा कामनेतून होळी पेटवली जाते आणि रंगांचा सण साजरा केला जातो. मग या होळी आणि धुळवडीच्या सणाच्या शुभेच्छा सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages, Twitter, Instagram, Telegram च्या माध्यमातून मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्टांसोबत शेअर करण्यासाठी या खास शुभेच्छा ही Greetings, शुभेच्छापत्र तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.

महाराष्ट्रात होळीचा सण 6 मार्च आणि त्यानंतर 7 मार्चला धुळवड अर्थात धुलिवंदन साजरं केलं जातं. होळीच्या दिवशी सुकलेली झाडं, पालापाचोळा गोळा करून होळी पेटवली जाते. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Holika Dahan 2023 Dos and Don'ts: होलिका दहन करत असतांना काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या .

होळीच्या शुभेच्छा

Holi Wishes | File Image

दहन व्हावे वादाचे

पूजावे श्रीफळ संवादाचे

नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा

आज सण आहे होळीचा!

Holi Wishes | File Image

होलिका दहनाच्या तुम्हा सार्‍यांना

मनापासून शुभेच्छा!

Holi Wishes | File Image

होळीच्या पवित्र अग्निमध्ये

जळून खाक होवोत सारी

दु:ख, समस्या, अमंगल गोष्टी

होळीच्या रंगांसोबत आनंदाने

बहरो सारी सृष्टी

होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा

Holi Wishes | File Image

खमंग पुरणपोळीत रमण्याआधी

रंगात रंगण्याआधी

होळीच्या धुरात हरवण्याआधी

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी

तुम्हांला होळी सणाच्या

हार्दिक शुभेच्छा!

Holi Wishes | File Image

वाईटाचा होवो नाश

तुमच्या आयुष्यात सदा राहो आनंदाचा प्रकाश

होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र आणि गोवा मध्ये होळीच्या दरम्यान शिमगोत्सव देखील साजरा केला जातो. गावामध्ये पालखी नाचवली जाते. दशावताराचे कार्यक्रम होतात. या सणाच्या माध्यमातून घराघरात एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. होळीच्या रंगासोबत वसंत ऋतूची देखील चाहुल लागते. निसर्गात आपोआप रंगांची उधळण होत असते. महाराष्ट्रात हा सण रंगपंचमी पर्यंत साजरा केला जातो.