Holika Dahan 2023 Dos and Don'ts: होलिका दहन करत असतांना काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या
Holika Dahan 2023 (Photo Credits: Getty Images)

Holika Dahan 2023 Dos and Don'ts:  होलिका दहन 6 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. होळीच्या दिवशी लोक वाईट गोष्टी आयुष्यातून जाव्या म्हणून पूजा करतात. होलिका दहनच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात, असे मानले जाते. सुख-समृद्धीसाठी देवाची प्रार्थना करावी. होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगाला अर्पण करा. तसेच, होळीच्या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान करणे शुभ मानले जाते. होलिका दहनाच्या दिवशी देवी लक्ष्मी घरात वास करते असे म्हटले जाते. दरम्यान, होलिका दहनाच्या वेळेस काय करावे काय करू नये ते आपण जाणून घेणार आहोत. होलिका दहनाच्या वेळेस काय करावे काय करू नये, जाणून घ्या

पाहा 

पैसे उधार देऊ नका: होलिका दहनाच्या दिवशी कोणालाही पैसे देणे टाळा. पैसे दिल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

 

डोक्यावर काहीही न ठेवता पूजा करू नका :पूजा करतांना डोक्यावर ओढणी, पदर किंवा स्कार्फशिवाय पूजा करू नका. मग ते स्त्री असोत किंवा पुरुष.

 

नवविवाहित जोडप्यांनी होलिका दहनाच्या दिवशी पूजा करावी: नवविवाहित जोडप्यांनी होलिका दहनाची पूजा आवर्जून करावी.

 

रस्त्यावर सापडलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका: होलिका दहनाच्या दिवशी, वाटेत सापडलेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये. स्पर्श करताच नकारात्मक प्रभाव आपल्यात येऊ शकतो.

 

पांढरे कपडे घालू नका: ज्योतिषशास्त्रानुसार, होलिका दहनाच्या दिवशी पांढरा रंग नकारात्मकता आकर्षित करतो असे मानले जाते.

 

भगवान शिवाची पूजा करा: जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर होळी दहनाच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करा. 

 

आर्थिक संकट टाळण्यासाठी : होळीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करा आणि जप करा. 

 

चारमुखी दिवा : होळीच्या रात्री घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावून त्याची पूजा करावी. 

होलिका दहनची पूजा करतांना या गोष्टी करू नये, दिलेल्या गोष्टींचे पालन केल्यास तुम्हाला नक्की लाभ होईल आणि देवी लक्ष्मी आणि श्री कृष्णचा कृपा सदैव तुमच्यावर राहील.