Holi 2023 Messages: हिंदू कॅलेंडरनुसार होळी दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. होळी हा हिंदू धर्मामधील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या सणाच्या पहिल्या दिवशी होलिका दहन साजरे केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. या दिवशी लोक एकमेकांना रंग, अबीर, गुलाल लावून एकमेकांना शुभेच्छा देतात. दुसरीकडे, धार्मिक मान्यतेनुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्यानंतर उपवास ठेवल्याने मनुष्याच्या दुःखांचा नाश होतो. होलिका दहन हा वाईटावर चांगल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
यंदा होळीचा सण 6 मार्चला साजरा केला जाणार आहे. होळीच्या सणानिमित्त लोक एकमेकांना रंग लावतात. त्याचबरोबर या दिवशी मित्र-नातेवाईक एकमेकांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छाही देतात. होळी निमित्त तुम्ही Images, Wishes, Whatsapp Status, Quotes, Greeting द्वारे आपल्या मित्र-मैत्रिणींना खास मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Holika Dahan 2023 Dos and Don'ts: होलिका दहन करत असतांना काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या)
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा शास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. पण त्यांच्यात प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप या भक्तांची कथा सर्वाधिक लोकप्रिय आहे. पौराणिक कथेनुसार, वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून होलिका दहन हा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.