Hanuman Jayanti 2022 Messages: हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, श्रीरामाचे भक्त हनुमान यांचा जन्म मंगळवारी चैत्र पौर्णिमेला चित्रा नक्षत्र आणि मेष लग्नाच्या संयोगात झाला. या दिवशी बजरंगबलीची उपासना करणाऱ्यांना अपेक्षित फळ मिळते, असे म्हटले जाते. यावेळी हनुमान जयंती शनिवार, 16 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. हनुमानाची पूजा करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यावेळी हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेचा विशेष योगही तयार होत आहे.
चैत्र महिन्याची पौर्णिमा शनिवार, 16 एप्रिल रोजी दुपारी 02.25 पासून सुरू होईल आणि रविवारी, 17 एप्रिल रोजी दुपारी 12.24 वाजता समाप्त होईल. या दिवशी हस्त आणि चित्रा नक्षत्र असतील. हनुमान जयंतीला पहाटे 5.55 ते 08.40 या वेळेत रवि योग देखील असेल. रवियोगात देवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात तुम्ही कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकता. हनुमान जयंती निमित्त Images, WhatsApp Status, Wishes, Greetings द्वारे तुमच्या प्रियजनांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान..
एक मुखाने बोला..
बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!!
भगवान हनुमान हे हिंदू धर्मातील सर्वात पूज्य देवतांपैकी एक आहे. हनुमानाला धैर्य, सामर्थ्य आणि त्याच्या संरक्षणाचे देवत्व मानले जाते. त्यांच्या पौराणिक कथांचे रामायणात तपशीलवार वर्णन केले आहे आणि संपूर्ण रामायण प्रकरणामध्ये त्यांची भूमिका मध्यवर्ती होती. त्यांच्याबद्दलच्या प्रचलित समजुतींमध्ये, त्यांची श्रीरामावरील अतूट भक्ती, त्यांचे बालपणीचे कुकर्म आणि माता सीतेला शोधण्यात भगवान श्रीरामाची मदत या गोष्टींचे प्रामुख्याने वर्णन केले आहे.