
उद्या 13 एप्रिल 2021 रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात, गुढीपाडवा (Gudi Padwa 2021) सण साजरा होत आहे. हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस समजला जातो. या दिवशी दरात गुढी उभारून त्याची पूजा केली जाते. गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. म्हणूनच श्रीराम जेव्हा चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावणाचा पराभव करून अयोध्येला परत आले, तेव्हा लोकांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू, खरेदी, व्यवसाय प्रारंभ, सुवर्ण खरेदी अशा गोष्टी केल्या जातात.
या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून, त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच दिवस समजला जातो. तर अशा या पवित्र दिनी Wishes, Images, Wallpapers, Messages, HD Images, Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती
नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती!
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चैत्राची नवी पहाट, घेऊन आली नव स्वप्नांची लाट
नवारंभ नवा विश्वास, नववर्षाची हीच खरी सुरूवात
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

निळ्या शुभ्र आभाळी, शोभे उंच गुढी
हे नववर्ष घेऊन येवो, तुमच्या आयुष्यात गोडी
गुढी पाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

दरम्यान, शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. सध्या राज्यावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने यंदा हा सण अतिशय साधेपणाने साजरा केला जावा असे राज्य सरकारने आवाहान केले आहे. (हेही वाचा: गुढी पाडव्याच्या दिवशी दारासमोर काढा 'या' सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाइन)
तसेच, कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी असे आवाहन करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.