Happy Gudi Padwa Rangoli Designs: गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा प्रारंभ, महाराष्ट्रातील मराठी बांधवांचे नवीन वर्ष गुढीपाढव्यापासून सुरु होते.महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्येही पाडवा 'उगादी', 'चेटी चांद' या वेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा 13 एप्रिल 2021 रोजी (मंगळवार ) साजरा केला जाईल.दक्षिण भारतीय राज्यांमध्ये हा दिवस कापणीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी शेतकरी शेतातून पिके घेतात आणि चांगल्या उत्पन्नाबद्दल देवाचे आभार मानतात.गुढी पाडव्याच्या दिवशी लोक पारंपारिक कपडे घालतात आणि घरात पूजा करुन गोड धोड जेवण बनवले जाते. गुढी पाडव्याच्या दिवशी आपली घरे फुलांनी सजवली जातात दारापुढे , अंगणात सुंदर रांगोळी ही काढली जाते. आज आम्ही तुमच्यासाठी गुडी पाडव्याच्या काही खास रांगोळ्या डिझाइनसाठी घेऊन आलो आहोत. या रांगोळी डिझाईन्समुळे आपल्या घराचे सौंदर्य वाढेल, तसेच प्रत्येकजण तुम्ही काढलेल्या रांगोळीचे नक्कीच कौतुक करेल. चला तर मग पाहूयात गुढी पाडवा स्पेशल रांगोळी. (Gudi Padwa 2021 Rangoli Designs: गुढीपाडव्याच्या दिवशी किचनमधील साहित्य वापरून दारासमोर काढा या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स )
स्वास्तिक गुढी रांगोळी डिझाइन
कंगव्याचा वापर करुन काढा गुढी रांगोळी
गुढी पाडवा स्पेशल सोप्या 5 रांगोळी डिझाईन्स
गुढी पाडवा रांगोळी
ठिपक्यांची गुढी पाडवा रांगोळी
पैठणी गुढी पाडवा रांगोळी
फुलांचा वापर करुन काढलेली गुढी पाडवा रांगोळी
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.