Gudi Padwa 2021 Messages in Marathi: चैत्र शुद्ध प्रतिपदेला मराठी नववर्षाचा आरंभ होतो. हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरोघरी गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत केले जाते. यंदा गुढीपाडवा मंगळवार, 13 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. महाराष्ट्राभर गुढीपाडव्याचा उत्साह असतो. दारी रांगोळ्या काढल्या जातात. तोरणं बांधतात. गुढी उभारतात. गोडाधोडाचे जेवण होते. नातेवाईक, मित्रमंडळींना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. रथ, देखावे सजवून शोभायात्रा काढल्या जातात. तसंच गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने, नववस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र कोरोना संकटामुळे मागील वर्षी प्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत अगदी साधेपणाने करावे लागणार आहे. मात्र सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा पाठवून तुम्ही सणाचा आनंद द्विगुणित करु शकता.
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Messages, Wishes, Images, WhatsApp Stickers तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करु शकता. (Happy Gudi Padwa Wishes 2021: गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी खास मराठी Images, Wallpapers, Messages, HD Images, Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा हिंदू नववर्ष दिन)
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात
नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात…
गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा
मंगलमय गुढी,
त्याला भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा
समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जगावरील संकट टळून
सर्वांना निरोगी आरोग्य लाभो,
गुढीपाडव्याच्या शुभदिनी हीच सदिच्छा
नववर्ष आणि पाडव्याच्या शुभेच्छा!

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Gudi Padwa टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.
यंदाही गुढी पाडव्याच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पाडव्याचा सण आणि नववर्षाचे स्वागत अगदी साधेपणाने घराच्या घरी करणे योग्य ठरेल. लेटेस्टली मराठीकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!