Happy Ganeshotsav 2019 HD Images: गणरायाच्या आगमनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, HD Greetings, Wallpapers, Wishes  देऊन करा आनंद द्विगुणित
Ganeshotsav 2019 HD Wishes (Photo Credits: Pixabay)

Ganeshotsav 2019 : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे भाद्रपद (Bhadrapad) महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला म्हणजे आज, 2 सप्टेंबर रोजी भारतासह देश विदेशातही गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) सोहळ्याची नांदी होणार आहे. यादिवशी देवांचा देव आणि 64 कलांचा अधिपती गणरायाचे भक्तांच्या घरी आगमन होते आणि पुढील काही दिवसात प्रत्येक जण यथाशक्ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेत रुजू होतो.गणेशोत्सवाचा सोहळा जरी देशविदेशात साजरा होत असला तरी महाराष्ट्रात या सणाचा विशेष उत्साह पाहायला मिळतो. जवळपास महिन्याभर आधीपासूनच गणेशाच्या आगमनाची तयारी करणारे जीव आज बाप्पाला पाहताच सुखावले असतील त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी गणरायाच्या आगमनाच्या अस्सल मराठमोळ्या शुभेच्छा खास ग्रिटिंग्स, HD Images, शुभेच्छापत्र शेअर करून पोळ्याचा आनंद नक्की शेअर करा. (Ganeshotsav 2019: मुंबईतील गणेशोत्सवाला चांद्रयान 2 मोहिमेचा साज, लालबागचा राजा आणि परळचा राजा होणार अंतराळात विराजमान)

Happy Ganeshotsav 2019 HD Images
Happy Ganeshotsav 2019 HD Images
Happy Ganeshotsav 2019 HD Images
Happy Ganeshotsav 2019 HD Images
Happy Ganeshotsav 2019 HD Images

आजपासून सुरु होणाऱ्या या सणाने सारा आसंमत भक्तिरसात न्हाऊन निघेल. प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे. या निमित्ताने लेटेस्टली मराठीच्या वतीने सुद्धा तुम्हाला गणेशोत्सावाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!