
ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा इंटरनॅशनल फ्रेंडशीप डे (International Friendship Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस 1 ऑगस्ट दिवशी जगभर सेलिब्रेट केला जाणार आहे. रक्ताची नाती आपल्या आयुष्यात नशीबाने येतात त्यांना निवडण्याची आपल्याला पूर्ण मुभा असतेच असे नाही पण ' मैत्री'च्या नात्याने आपल्या आयुष्यात आलेली मंडळी ही स्पेशल असतात कारण ती निवडण्याचा पूर्ण अधिकार आपल्याकडे असतात आणि या नात्याच्या सेलिब्रेशनचा एक दिवस म्हणजेच इंटरनॅशनल फ्रेंडशीप डे (Friendship Day) किंवा मैत्री दिन. यावर्षी देखील कोरोनाचं संकट पाहता रविवारी तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत सर्रास सेलिब्रेशन करू शकणार, प्रत्येकाचीच गळाभेट घेऊ शकणार नाही. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून आज फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस, HD Images, GIFs, Wishes शेअर करत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करा आणि तुमचं मैत्रीचं नातं वृद्धिंगत करायला एक पाऊल पुढे या. Happy Friendship Day Messages 2021: 'फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने खास Quotes, Wishes, Images, Greetings च्या माध्यमातून मित्रासमोर व्यक्त करा आपल्या भावना.
फ्रेंडशीप डे सेलिब्रेशनची नेमकी सुरूवात कुठे, कशी झाली याचं नेमकं कारण नाही पण ग्रीटिंग कार्ड इंडस्ट्री कडून त्याची सुरूवात झाली. फ्रेंडशीप डे कार्ड्स पाठवून एकमेकांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या दिवसाची सुरूवात करण्यात आली असं सांगितलं जातं. हळूहळू हे लोण जगभर पसरलं. मैत्री दिनाच्या निमित्ताने तरूणाईमध्ये उत्साह , आनंद, जल्लोष भरला आणि हा दिवस अधिक स्पेशल होत गेला. अनेक कॉलेज कट्ट्यांवर या दिवसांच्या निमित्ताने खास सेलिब्रेशन सुरू झालं. कुणी चॉकलेट्स वाटून तर कुणी फ्रेंडशीप बॅण्ड बांधून हा दिवस सेलिब्रेट करायला लागला. आज हे सारं शक्य नसलं तरीही डिजिटल माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा नक्कीच शेअर करू शकता.
फ्रेंडशीप डे 2021 च्या शुभेच्छा

जीवन आहे तिथे आठवण आहे
आठवण आहे तिथे भावना आहे
भावना आहेत तिथे प्रेम आहे
प्रेम आहे तिथे मैत्री आहे
जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहे
हॅप्पी फ्रेंडशीप डे

निसर्गाला रंग हवा असतो
फुलाला गंध हवा असतो
माणून एकटा कसा राहणार
त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री असावी मनाची मनाशी
मैत्री असावी जन्मा-जन्माची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशीच मैत्री असावी तुझी अन माझी
हॅप्पी फ्रेंडशीप डे

स्नेहाचं हे बंधन असंच अतुट रहावं
आपण असंच जीवनभर मैत्रीचं गाणं गुणगुणावं
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव
भरून काढते आयुष्यात अनेक नात्याची उणीव
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

सध्या जगात कोरोना संकटामुळे निराशेचं वातावरण आहे. यामध्ये अनेकांना आपल्या जीवाभावाच्या व्यक्तींपासून दूर रहावं लागलं. रक्ताच्या नात्यासाठी अनेक मैत्रीची नाती संकटात धावून आली. काही नाती मागे पडली असतील तर सोशल मीडीयामुळे एकमेकांना कधीच न भेटलेली, पाहिलेली अनेक मंडळी एकमेकांच्या साथीला उभी राहिली असतील. या सार्यांमधूनच बहारलेल्या नव्या मैत्रीच्या सेलिब्रेशनचा आजचा दिवस नक्की सेलिब्रेट करा. हॅप्पी फ्रेंडशीप डे!