Happy Doctors’ Day 2022 Messages: राष्ट्रीय डॉक्टर्स दिन भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. वास्तविक, 1 जुलै रोजी देशाचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय (Bidhan Chandra Roy) यांची जयंती आणि पुण्यतिथी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी, दरवर्षी 1 जुलै रोजी देशभरात डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 1991 मध्ये भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर्स दिन (Doctors Day) साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाबद्दल आदर व्यक्त करणे हा या मागचा उद्देश आहे.
राष्ट्राच्या प्रगतीत डॉक्टरांच्या भूमिकेची कबुली देण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. डॉक्टर रुग्णांच्या सेवेत रात्रंदिवस तत्पर असतात. अशा स्थितीत त्यांना आदर दाखवण्यासाठी डॉक्टर्स डेनिमित्त शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण केली जाते. तुम्ही हे संदेश, व्हॉट्सअॅप शुभेच्छा, कोट्स आणि फेसबुक ग्रीटिंग्ज शेअर करून राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देखील देऊ शकता.
आपल्यावर आलेलं आरोग्यसंकट
देवदूत रूपी होऊन दूर सारणार्या
प्रत्येक आरोग्यकर्मीला सलाम
राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोरोना विरुद्धच्या प्राणघातक लढ्यात ढाल बनून उभे राहिलेल्या
सर्व डॉक्टरांना सविनय प्रणाम
डॉक्टर दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
रुग्णांना बरे करणे हा एकच ध्यास
अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून
आजचा दिवस करूया खास
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले
असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हास भेटले
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कर्तव्याची जाण ठेवून
रात्रंदिवस करतात रुग्णसेवा
अशा या कर्तव्यनिष्ठ डॉक्टरांचा
साऱ्या जगालाच वाटतो हेवा
डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने
काम करणार्या प्रत्येकाला धन्यवाद!
हॅप्पी डॉक्टर्स डे!
बिहारमधील पाटणा येथे जन्मलेले विधानचंद्र रॉय प्रेसिडेन्सी कॉलेज, पाटणा कॉलेज आणि कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडला गेले. वास्तविक, त्याने लंडनमधील सेंट बार्थोलोम्यू हॉस्पिटलमध्ये अॅडमिशनसाठी प्रयत्न सुरू केले, परंतु 30 लोकांनी नकार दिल्यानंतर त्याला अखेर अॅडमिशन मिळाले. येथे दोन वर्षे ते रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनचे सदस्य आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जनचे फेलो बनले.