Happy Doctors' Day 2021 Wishes in Marathi: डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा Facebook Messages, Quotes, WhatsApp Status शेअर करत म्हणा त्यांना थॅक्स!
Doctors Day 2021| File Photo

भारतामध्ये 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स डे (National Doctors' Day 2021) म्हणून साजरा केला जातो. प्रामुख्याने देशात हा दिवस इंडियन मेडिकल असोसिएशन कडून साजरा केला जातो. समाजामध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे आहे. मागील दीड वर्ष कोरोना संकटाशी लढताना डॉक्टरांच्या योगदानाचं, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचं प्रकर्षाने सार्‍यांना महत्त्व पटलं आहे. त्यामुळे या डॉक्टर्स डे च्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात आपल्या सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या प्रत्येकाला सलाम करत त्यांच्या कार्याप्रती धन्यवाद म्हटलं जातं. जगभरात डॉक्टर्ड डे साजरा करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत पण भारतामध्ये हा डॉक्टर्स डे 1 जुलै म्हणजे उद्याच साजरा होणार असल्याने सध्या आपला जीव धोक्यात घालून रूग्णांना जीवनदान देण्यासाठी झटणार्‍या प्रत्येक डॉक्टरला आज या राष्ट्रीय डॉक्टर डे चं औचित्य साधत एकदा थॅक्स म्हणायला विसरू नका. त्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ही खास शुभेच्छापत्रं, मराठी मेसेजेस,Wishes, HD Images, Photos Facebook,WhatsAppवर शेअर करायला विसरू नका. Happy Doctor's Day 2021 Messages: राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त Wishes, Quotes, Greetings शेअर करुन जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांचे माना आभार!

भारतामध्ये प्रसिद्ध डॉक्टर डॉ बिधान चंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ हा डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 1 जुलै हा डॉ. रॉय यांचा जन्मदिन आणि पुण्यतिथीचा दिन देखील आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देत डॉक्टरांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. 1991 पासून भारतात 1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.

हॅप्पी डॉक्टर्स डे 2021

Doctors Day 2021| File Photo

राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्यावर आलेलं आरोग्यसंकट
देवदूत रूपी होऊन दूर सारणार्‍या
प्रत्येक आरोग्यकर्मीला सलाम
राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Doctors Day 2021| File Photo

कोरोना संकटाशी अविरत झुंजणार्‍या
कोविड योद्धा 'डॉक्टर'ला धन्यवाद
डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा!

Doctors Day 2021| File Photo

वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने
काम करणार्‍या प्रत्येकाला धन्यवाद!
हॅप्पी डॉक्टर्स डे

Doctors Day 2021| File Photo

मागील वर्ष, दीड वर्षांपासून डॉक्टरांसह आरोग्य सेवक कोविड - नॉन कोविड रूग्णांसाठी आपली सेवा देत आहेत. अनेकांनी आपल्या सुखी, चैनीत सुरू असलेल्या आरोग्य सेवेचा, लाईफस्टाईलचा त्याग करून मागील दीड वर्ष पूर्णवेळ रूग्णसेवेला दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याप्रती सजग नागरिक म्हणून कृतज्ञता व्यक्त करत आजच्या दिवशी त्यांना एकदा थॅक्यू नक्कीच म्हणायला हवं.