Doctor's Day 2021 Marathi Messages: डॉक्टर्स जीवनदान देतात. त्यामुळेच त्यांना मानवरुपी देव मानले जाते. डॉक्टरांप्रती सजामामध्ये नितांत आदर आहे. कोरोना व्हायरस संकट काळात तर डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित झाले. डॉक्टरांनी देखील जीवाची बाजी लावून या लढ्यात काम केले. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके थोडेच. अशाच या डॉक्टरांसाठी एक दिवस समर्पित करण्यात आला आहे. तो म्हणजे डॉक्टर्स डे. दरवर्षी डॉक्टरांच्या सन्मानार्थ 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे (National Doctor’s Day) साजरा केला जातो. भारतामधील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बिधान चंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्दांजली म्हणून त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
डॉक्टर्स डे निमित्त खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Images, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचे आभार माना.
डॉक्टर दिनाचे शुभेच्छा संदेश:
रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले
असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हास भेटले
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रुग्णांना बरे करणे हा एकच ध्यास
अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून
आजचा दिवस करूया खास
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोरोना विरुद्धच्या प्राणघातक लढ्यात ढाल बनून उभे राहिलेल्या
सर्व डॉक्टरांना सविनय प्रणाम
डॉक्टर दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
आपल्या कर्तव्याची जाण ठेवून
रात्रंदिवस करतात रुग्णसेवा
अशा या कर्तव्यनिष्ठ डॉक्टरांचा
साऱ्या जगालाच वाटतो हेवा
डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देवासारखे येती धावून
देवासारखे करतात काम
माणसातल्या देवाला या
सदैव आमचा सलाम
डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा!
1991 सालापासून भारतात नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्याची सुरूवात झाली. त्यानंतर दरवर्षी 1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा होऊ लागला. प्रत्येक वर्षी वेगळ्या थीमवर डॉक्टर्स डे साजरा होतो.