Happy Dhulivandan 2020 Marathi Wishes: हुताशनी पौर्णिमे दिवशी होळीचा (Holi) सण साजरा केल्यानंतर दुसर्या दिवसापासूनच धुळवड (Dhulwad) म्हणजेच धुलिवंदनाच्या (Dhulivandan) निमित्ताने रंगाची उधळण सुरू होते. जसा निसर्ग वसंत ऋतूच्या आगमनाची या दिवसापासून चाहूल देतो तसेच आपल्या धकाधकीच्या आयुष्यात धुलिवंदनाच्या सणानिमित्त रंगोत्सवाची धूम असते. महाराष्ट्रात धूळवड, धुलिवंदन किंवा शिमगा (Shimga) म्हणून हा सण ओळखला जातो. यंदा धुलिवंदन महाराष्ट्रात 10 मार्च दिवशी खेळला जाणार आहे. मग या आनंदोत्सवाच्या शुभेच्छा तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यासोबत शेअर करून तो द्विगुणित करा. आजकाल सोशल मीडिया आणि डिजिटल युगाची चलती असल्याने इंस्टाग्राम, फेसबूक, व्हॉट्सअॅप,ट्विटर यासारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून धुलिवंदनाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस, HD Images, Wishes, SMS शेअर करायला विसरू नका. होळीच्या दिवशी सार्या दु:खांचा, विनाशी गोष्टींचे दहन केल्यानंतर वसंतोत्सवानिमित्त रंगांचा खेळ खेळला जातो. मग आज त्याची सुरूवात हे मेसेजेस आणि विशेस देऊन नक्की करा! Holi 2020 Date: होळी कधी आहे? जाणून घ्या होलिका दहनाचा मुहूर्त ते रंगपंचमी सेलिब्रेशनच्या तारखा.
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
होळी व धुलिवंदनाच्या खूप सार्या शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड-
रंगबेरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाला
दृष्टप्रवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला
धुलिवंदन आणि होळीच्या शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड-
होळी पेटू दे, द्वेष जळू दे
जीवनात तुमच्या कायम आनंदाचे रंग बरसू दे
धुलिवंदनाच्या शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड-
बेभान मन, बेधुंद आसमंत
भांगे सह सर्वत्र आनंद
चला होऊ सारे होळीच्या सणात दंग
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड-
आयुष्यात तुमच्या नवचैतन्याचे सारे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य हे रंगबिरंगी होवो!
धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
धुळवडीच्या शुभेच्छा देणारे GIFs
महाराष्ट्रासह भारताच्या विविध भागात फाल्गुन महिन्याचा पौर्णिमेला होळी पेटवली जाते. दुसर्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी ती दुधाने विझवली जाते. त्यानंतर रंगांचा खेळ रंगायला सुरूवात होते. फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच रंगपंचमी पर्यंत रंगांचा खेळ खेळला जातो. महाराष्ट्रात या सणाच्या निमित्ताने खास पुरणपोळीचा बेत केला जातो. मग यंदा तुम्हीही होळीच्या खेळाचा आनंद घ्या, पुरणपोळींवर ताव मारा! लेटेस्टली परिवाराकडून तुम्हा सार्यांना होळी व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!