व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) मधील तिसरा दिवस हा चॉकलेट डे ( Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो. प्रेमी युगूलांसाठी खास असणारा फेब्रुवारी महिन्यातील व्हेलेंटाईन वीक स्पेशल करण्यासाठी दरदिवशी काही खास सेलिब्रेशन असतं. चॉकलेट हे असेही सुख, दु:खामध्ये मूड थोडा रिलॅक्स करण्यासाठी मदत करतो. साध्या चॉकलेटच्या गोळ्यांपासून अगदी महागडी चॉकलेट्स या दिवसाच्या निमित्ताने एकमेकांना दिली जातात. त्यामध्ये अनेक प्रकार आणि फ्लेवर्स आता उपलब्ध आहेत. मग व्हेलेंटाईन वीक मधील खास चॉकलेट डे च्या सेलिब्रेशन साठी तुम्ही चॉकलेट सोबतच खास मेसेज WhatsApp Status, Messages, Wishes, Greetings द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
चॉकलेट डे च्या निमित्ताने मित्र मैत्रिणींना चॉकलेट्स दिली जातात. क्वचितच कुणाला चॉकलेट आवडत नाही असं होत असेल. कोणत्या न कोणत्या स्वरूपातील चॉकलेट प्रत्येकाला आवडतेच. आता आईस्क्रिम पासून कॉफी, वॅफल मध्येही चॉकलेटचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या त्या खास व्यक्तीला चॉकलेट देऊन नक्की हा दिवस खास बनवा. नक्की वाचा: Valentine’s Day 2023 Gift Ideas: जोडीदाराला द्या हटके गिफ्ट, दणक्यात साजरा करा व्हॅलेंटाईन डे .
चॉकलेट डे 2023 च्या शुभेच्छा
हॅप्पी चॉकलेट डे!
चॉकलेट डे च्या माझ्या आयुष्यातील
सगळ्यात गोड व्यक्तीला शुभेच्छा!
हॅप्पी चॉकलेट डे!
चॉकलेट विशिष्ट स्वरूपात खाल्ल्यास त्याचा आरोग्याला देखील फायदा होतो. प्रामुख्याने डार्क चॉकलेटचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.