Apara Ekadashi 2020 Wishes: अपरा एकादशीच्या शुभेच्छा Messages, Greetings, HD Images च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा यंदाचा अचला एकादशीचा मंगलमय दिवस!
Apara Ekadashi 2020 Wishes| File Photo

Happy Apara Ekadashi 2020: हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात. यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी दिवशी वारकर्‍यांमध्ये मोठा उत्साह असला तरीही वर्षभरातील इतर एकादशी दिवशी देखील विविध व्रतं पाळली जातात. दरम्यान आज 18 मे दिवशी वैशाख कृष्ण एकादशी म्हणजे अपरा एकदशी (Apara Ekadashi)आहे. अपरा एकादशी अचला एकादशी (Achala Ekadashi)  म्हणून देखील ओळखली जाते. मग या एकादशीचं औचित्य साधून तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील एकादशीचं व्रत पाळणार्‍या भाविकांना अचला एकादशीच्या किंवा अपरा एकादशीच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आजचा दिवस खास बनवा. आज लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्येही प्रार्थनास्थळं बंद असल्याने देवळात जाणं शक्य नाही. परंतू इंटरनेटच्या मदतीने आज तुम्ही फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यामातून मराठमोळी ग्रिटिंग्स, मेसेजेस, एसएमएस, शुभेच्छापत्र शेअर करू आजच्या अपरा एकादशीच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करू शकता. Apara Ekadashi 2020 Date: अपरा एकादशी 2020 चा मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

दरम्यान अपरा एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश होऊन स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा होतो अशी धारणा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून पापांमधून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. काही जण दिवसभर उपवास करून विष्णूसहस्त्रनामावलीचं पठण करतात.

अपरा एकादशीच्या शुभेच्छा

Apara Ekadashi 2020 Wishes| File Photo
Apara Ekadashi 2020 Wishes| File Photo
Apara Ekadashi 2020 Wishes| File Photo
Apara Ekadashi 2020 Wishes| File Photo
Apara Ekadashi 2020 Wishes| File Photo

अपरा एकादशी दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. दरम्यान अपरा एकदाशीचं व्रत मकर संक्राती दिवशीचं गंगा स्नान, शिवरात्रीचं काशीमधील स्नान यामुळे मिळणार्‍या पुण्याइतकंच पवित्र असतं. अशी भाविकांची धारणा आहे. मग धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणार्‍या आजच्या अपरा एकादशी म्हणजेच अचला एकादशीच्या तुम्हांला खूप सार्‍या शुभेच्छा! आजची एकादशी तुमच्या आयुष्यात खूप सारा आनंद, सुख, समाधान घेऊन येवो! हीच आमची प्रार्थना.