
Happy Anant Chaturdashi 2019 Images and Wishes in Marathi: हिंदू धर्मीयांमध्ये सार्या शुभ कार्यांमध्ये अग्रस्थानी असलेल्या गणेशाचं भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी आगमन होतं. दहा दिवसांच्या सेवेनंतर, भक्तांसोबत मुक्कामानंतर अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन केले जाते. यंदा हा अनंत चतुर्दशीचा सण 12 सप्टेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. भक्तांच्या घरी येणारा गणपती बाप्पा ही एकमेव देवता आहे. त्यामुळे त्याला निरोप देताना भक्तांचीदेखील पावलं जड होतात. मात्र तरीही जितक्या उत्सहाने गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये गणेशाची पूजा अर्चना केली जाते तितक्याच धामधूमीमध्ये बाप्पाचं विसर्जन देखील केलं. आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या..' म्हणतं बाप्पाला आज जड अंतःकरणाने निरोप दिला जाणार आहे. मग तुमच्या गणेशभक्त मित्रपरिवारातील लोकांसोबत, कुटूंबातील सदस्यांसोबत गणेशोत्सवातील आजचा शेवटचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीचा आनंदही शेअर करत खास HD Greatings,Images व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मेसेंजरच्या माध्यमातून शेअर करत गणेशोत्सव 2019 ची सांगता करा. Anant Chaturdashi 2019: अनंत चतुर्दशी दिवशी का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या त्यामागची दंतकथा





यंदा गणेशोत्सवाचं औचित्य साधून मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईमध्ये मध्यान्ह म्हणजे दुपारी 12 नंतर वाहतूक मार्ग गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी मोकळे ठेवले जाणार आहे. समुद्रकिनारे, पाणवठे, नदी, तलाव यांच्यामध्ये आज 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन केले जाणार आहे.