Happy Amebdkar Jayanti HD Images 2021: आंबेडकर जयंती निमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून करा डॉ. बाबासाहेबांना वंदन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)

Happy Amebdkar Jayanti HD Images 2021: आज (14 एप्रिल)  संपूर्ण देशात भारतीय संविधानाचे लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी 14 एप्रिलला त्यांचा जन्मोत्सव हा त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आयुष्यभर दलितांना न्याय आणि अधिकार मिळावेत यासाठी मोठा संघर्ष केला आहे. यासाठीच भीम जयंती समता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणून साजरी केली जाते. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेल्या आंबेडकर यांच्या वडीलांचे नाव रामजी मालोजी  सकपाल आणि आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकर यांनी आयुष्यात संघर्ष करत उच्च शिक्षणासह समाजाला शिक्षित केले. (Ambedkar Jayanti Songs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महामानवाला अभिवादन करणारी खास भीमगीतं!)

भारतात आंबेडकर जयंती मोठ्या आनंदात साजरी केली जाते. परंतु यंदा सुद्धा कोरोनाची परिस्थिती कायम असल्याने ती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र तुम्ही नाराज होऊ नका कारण सोशल मीडियाच्या माध्यामातून तुम्ही आंबेडकर जयंती निमित्त मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून एकमेकांना शुभेच्छांसह देऊ शकता. तसेच घरच्या घरीच तुम्ही आंबेडकरांना अभिवादन करावे असे ही सांगण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)

दरम्यान, 14 ऑक्टोंबर 1956 मध्ये नागपूरात एका औपचारिक सार्वजनिक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रीलंकेतील महान बौद्ध भिभु महत्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिरत्न आणि पंचशील आपलेसे करत बौद्ध धर्मचा स्विकार केला होता. त्यांनी आपले अखेरचे पुस्तक 'द बुद्ध अॅन्ड हिज धम्म' लिहिले होते. हे पुस्तक पूर्ण केल्यानंतरच्या तीन दिवसांनी 6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकर यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये त्यांचे अखेरचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कावेळी त्यांनाच साक्षी मानून जवळजवळ 10 लाख अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.