Happy Akshaya Tritiya 2021 Wishes: अक्षय्य तृतीया किंवा आखा तीज यांना वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाची तृतीय तिथी म्हणून ओळखले जाते. पौराणिक ग्रंथांनुसार, या दिवशी जे काही शुभ कार्य केले जातात, त्याचे शुभ परिणाम होतात. म्हणूनचं त्याला अक्षय्य तृतीया म्हणतात. शुक्ल पक्षीय तृतीया सर्व बारा महिन्यांसाठी शुभ आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लग्न, गृह-प्रवेश, कपड्यांची, दागिन्यांची खरेदी किंवा घर, प्लॉट, वाहन इ. अशी कोणतीही शुभ कामे कोणतीही पंचांग न पाहता करता येतात. या दिवशी नवीन नवीन संस्था, सोसायटी इ. स्थापित करणे किंवा उद्घाटन करणे शुभ मानले जाते. या दिवशी पूर्वजांना दिलेली तर्पण आणि पिंडदान किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दान केल्यास चांगले फळ मिळते. या दिवशी गंगा स्नान करून आणि देवाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो.
यंदा 14 मे रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्यात येणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मराठमोळ्या शुभेच्छा Images, Messages, Whatsapp Status द्वारे शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना या मंगलमयी दिवसाच्या खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (वाचा - Akshay Tritiya 2021 Rangoli Designs: अक्षय तृतीया च्या दिवशी काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन)
आशा आहे या मंगल दिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारा प्रत्येक दिवस आपल्या जीवनात
सुख-समृद्धी घेऊन येवो
अक्षय्य तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा
अक्षय राहो सुख तुमचे
अक्षय राहो धन तुमचे
अक्षय राहो प्रेम तुमचे
अक्षय राहो आरोग्य तुमचे
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय्य तृतीयाचा आला शुभ दिन
देवी लक्ष्मीच्या चरणी व्हा लीन
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
अक्षय्य तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
तुमच्या घरात धनाची बरसात होवो
लक्ष्मीचा सदैव वास राहो
संकटांचा नाश होवो
शांती चा वास राहो
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा
अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूचे अवतार नर-नरायण, हयग्रीव आणि परशुराम यांचा जन्म झाला होता. म्हणूनचं अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नारायण आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी त्रेतायुगला सुरुवात झाली, असे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असते.