जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी हज यात्रा ही एक पवित्र यात्रांपैकी एक असते. अल-हिज्जाह् या महिन्यात त्याच आयोजन केले जाते. यंदाच्या हज यात्रेला आज (29 जुलै) पासून सुरूवात झाली आहे. दरम्यान कुराणामध्ये किमान एकदा मुस्लिम व्यक्तीने हज यात्र करावी असे सांगितले आहे. त्यामुळे दरवर्षी जगभरातून अनेकांना या यात्रेचा अनुभव घेण्याची इच्छा असते. इस्लाम धर्मामध्ये पाच प्रमुख स्तंभापैकी एक असलेल्या हज यात्रेचं आयोजन इस्लामी कॅलेंडरच्या 12 व्या आणि अंतिम महिन्यात आयोजित केले जाते. अल-हिज्जाह् च्या 8 ते 12 तारखेदरम्यान त्याचं आयोजन केले जाते. मग यंदाच्या या हज यात्रेच्या पर्वाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना, मित्र मैत्रिणींना देऊन त्यांचा दिवस खास बनवा. हज मुबारक ही ग्रीटींग्स फेसबूक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शेअर करून त्याच्या आनंद द्विगुणित करण्यासाठी ही खास शुभेच्छापत्रं!
हज मुबारक शुभेच्छापत्रं
मुस्लिम बांधवांसाठी प्रमुख तीन ईद मधील एक बकरी ईद यंदा जगभरात साजरी केली जाणार आहे. मुस्लिम धर्मीयांसाठी बकरी ईद हा दिवस खास असण्याच अजून एक कारण म्हणजे मक्का या पवित्र स्थळी गेलेल्यांच्या हज यात्रेचा हा अखेरचा दिवस असतो. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा ही बकरी ईद 31 जुलै दिवशी सुरू होईल आणि 1 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत साजरी केली जाईल.