
Guru Ravidas Jayanti 2025 HD Images in Marathi: हे 15व्या शतकातील एक महान संत, कवी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे माघ पौर्णिमेला झाला. यंदा 12 फेब्रुवारी 2025 रोजी गुरु रविदास जयंती (Guru Ravidas Jayanti 2025) साजरी केली जाईल. त्यांच्या अनुयायांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. रविदासांच्या जन्म आणि मृत्यूच्या नेमक्या तारखा फारशी माहिती नाहीत, परंतु काही विद्वानांचा असा अंदाज आहे की, त्यांचा जन्म इ.स. 1377 मध्ये झाला आणि इ.स. 1528 मध्ये त्यांचे निधन झाले. गुरु रविदास यांच्या आईचे नाव माता कलसा (कर्मा देवी) आणि वडिलांचे नाव संतोक दास (रग्घु) होते. त्यांचे मूळ नाव 'रवि' असे होते. संत रविदास यांना महाराष्ट्रात संत रोहिदास म्हणून ओळखले जाते.
रविदासजींनी आपल्या जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांनी जातिव्यवस्थेचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या रचनांमध्ये ईश्वरभक्ती, मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. त्यांच्या काही रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत, ज्यामुळे त्यांना शीख धर्मातही महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. रविदासजींचे शिष्य आणि अनुयायी भारतभर आहेत, आणि त्यांची जयंती माघ पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. त्यांच्या शिकवणी आजही आजही समाजाला प्रेरणा देतात.
संत रविदास यांच्या जयंतीच्या निमित्ताने Messages, Wishes, Wallpaper, WhatsApp Status, HD Images शेअर करत तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: Magh Purnima 2025: माघ पौर्णिमेला का केले जाते स्नान दान? जाणून घ्या महत्व आणि पूजा विधी)





दरम्यान, रविदासजींना रायदास, रोहिदास आणि रुहिदास असेही म्हणतात. त्यांचा जन्म एका चांभार कुटुंबात झाला. संत रविदासजींचा जातीवर कधीच विश्वास नव्हता. समाजाला जातीभेदातून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जातीभेद नष्ट करून, त्यांनी लोकांना एकतेचा धडा शिकवला आणि त्यांना अखंड भारतासाठी प्रोत्साहित केले. संत रविदासांच्या जयंतीनिमित्त देशाच्या विविध भागात कीर्तनासह मिरवणुका काढल्या जातात, ज्यामध्ये गाणी, संगीत आणि दोहे गायले जातात. हा महत्त्वाचा प्रसंग साजरा करण्यासाठी देशातील रविदास यांचे अनुयायी-भक्त पवित्र नद्यांमध्ये किंवा संगमावर स्नान करून रविदास यांची पूजा-अर्चना करतात.