Magh Purnima 2025: हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. पौर्णिमा ही महिन्यातून एकदा येणारी अत्यंत शुभ तिथी मानली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेची तिथी माघ पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा ही शुभ तिथी 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी रोजी येत आहे. शिवपुराणानुसार या दिवशी धनाची देवी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली जाते. पौर्णिमा हा सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे, जो महिन्यातून एकदा साजरा केला जातो. हिंदू धर्मात पौर्णिमेला खूप धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूच्या पूजेसाठी समर्पित आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस बुधवारी, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा केला जाईल. शिवपुराणानुसार माघ पौर्णिमेला पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुतले जातात. त्यामुळे अनेक भाविकांनी गंगा किनारी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
माघ पौर्णिमा स्नान दान पूजा विधी
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर माघ पौर्णिमेच्या दिवशी चारमुखी दिवा लावण्याची पद्धत आहे तसेच चंद्र दर्शनानंतर पितृ स्तोत्राचे पठण करावे त्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तसेच असे केल्याने पितृही प्रसन्न होतात. माघ पौर्णिमेला उपवास करून लाभ मिळावे म्हणून पूजा केली जाते. माघी पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते. परंपरेनुसार माघी पौर्णिमेला, १२ फेब्रुवारीला भाविक महाकुंभात स्नान करतील, पूजन आणि दान करणार आहेत. महाकुंभात कल्पवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा कल्पवासासाठी देशभरातून भाविक संगमाच्या काठावर जमले आहेत. शास्त्रानुसार 12 फेब्रुवारी, माघ पौर्णिमेला कल्पवासचा समारोप होईल.
माघ पौर्णिमा तिथी
माघ पौर्णिमेची वेळ पौर्णिमा (पौर्णिमा) 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुरू होईल आणि 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी संपेल. 12 फेब्रुवारी रोजी उपवास करण्यात येणार आहेत.
दरम्यान, कल्पवासमध्ये पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमेपर्यंत संगमाच्या काठावर महिनाभर उपवास, आत्मसंयम आणि देवाचे नामस्मरण केले जाते. काही भाविक पौष महिन्याच्या एकादशीपासून माघ महिन्याच्या द्वादशीपर्यंत कल्पवासाचे पालन करतात.